Hair Care- निरोगी केसांसाठी जास्वंदीचे फूल आहे वरदान! वाचा सविस्तर

Hair Care- निरोगी केसांसाठी जास्वंदीचे फूल आहे वरदान! वाचा सविस्तर

केसांच्या वाढीसाठी जास्वंद फुलाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. या फुलाच्या वापराने केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. तसेच या फुलामुध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनोइड्स, एमिनो अॅसिड, म्यूसिलेज फायबर, आर्द्रता आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे केसांसाठी हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत.

निरोगी केसांसाठी जास्वंद हेअर मास्क खूप गरजेचा आहे. निरोगी केसांसाठी जास्वंदीचे फुल हे खूप गरजेचे आहे. जास्वंदीचे पान आणि फूल या दोन्हींचा केसांसाठी उपयोग खूप महत्त्वाचा आहे. केस हे आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जास्वंद केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

 

कसा कराल जास्वंद हेअर मास्क 

याकरता 6 ते 8 ताजी लाल जास्वंदीची फुले घ्यावीत. यामध्ये काही जास्वंदीच्या झाडाची पानेही घ्यावीत. चांगले धुवून मिक्सरमधून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. सुमारे एक तास तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर डोके धुवावे. निरोगी केसांसाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

 

 

जास्वंद आणि दही हेअर मास्क

3 ते 4 ताजी जास्वंद फुले नीट धुवून त्याची पेस्ट बनवावी. फुलांच्या पेस्टमध्ये 2-3 चमचे ताजे दही घाला आणि दोन्ही चांगले मिसळा. हे सर्व  केसांवर लावून चांगला मसाज करावा. एकदा पूर्ण झाल्यावर, आपले केस शॉवर कॅपने झाकून ठेवा आणि एक तास मिश्रण तसेच ठेवावे. त्यानंतर केस धुवावेत.

जास्वंद नारळ तेल हेअर मास्क कसा कराल?

6 ते 8 ताजी लाल जास्वंद आणि थोडी जास्वंदीची पाने घ्यावीत. सर्व नीट धुवून घ्यावे. बारीक करून एक पेस्ट बनवावी. यामध्ये थोडे खोबरेल तेल घालावे. ते एकत्र मिसळून मिश्रण केसांवर नीट लावावे. किमान 45 ते 60 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर सौम्य शैम्पू वापरून कोमट पाण्याने डोके धुवावे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Chagan Bhujbal : मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान, छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र, त्या वक्तव्याने आता वाद पेटणार Chagan Bhujbal : मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान, छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र, त्या वक्तव्याने आता वाद पेटणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्धाची ठिणगी पडली आहे. छगन भुजबळ यांनी पहिली तोफ डागली आहे....
रणधीर सावरकरांनी गाजवले अर्थसंकल्पीय अधिवेशन, अकोल्याचे प्रश्न सरकारसमोर मांडले
बिग बॉस फेम अभिनेत्रीचा मोठा निर्णय; इंडस्ट्री सोडून या मार्गावर वाटचालीचा निर्णय
अवकाळी पाऊस-गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मात्र पंचनाम्याचे आदेश देण्यास सरकारला फुरसत नाही – विजय वडेट्टीवार
पुढच्या तीन चार तासांत उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हवामान विभागाचा इशारा
Jalana News मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
पाकिस्तानी नागरिकाची पंजाब सीमेवरून हिंदुस्थानात घुसखोरी, बीएसएफने घेतले ताब्यात