‘या’ 2 सिनेमांवर बंदी, नाहीतर सलमान खान – ऐश्वर्या राय यांचा मोठ्या पडद्यावर रंगला असता रोमान्स
Salman Khan – Aishwarya Rai: अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या बद्दल काही वेगळं सांगायला नको. आजच्या घडीला प्रत्येकाला दोघांच्या रिलेशनशिपबद्दल माहिती आहे. आज सलमान – ऐश्वर्या एकमेकांचं तोंड पाहत नाहीत, पण एक काळ असा होता, जेव्हा फक्त बॉलिवूडच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असायची. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमात सलमान – ऐश्वर्या यांनी एकत्र काम केलं आणि त्यांच्यामध्ये प्रेम बहरलं.
फक्त ऑनस्क्रिनच नाही तर, ऑफस्क्रिन देखील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट देखील केलं. पण सलमान – ऐश्वर्या यांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. त्यांच्या नात्याचा अंत देखील फार वाईट होता. सोशल मीडियावर दोघांचे जुने फोटो आणि व्हिडीओ आजही व्हायरल होत असतात.
सांगायचं झालं तर, ‘हम दिल दे चुके सनम’ या एकाच सिनेमात दोघांची केमिस्ट्री चाहत्यांच्या समोर आली. पण असे आणखी दोन सिनेमे होते, ज्यामध्ये सलमान – ऐश्वर्या यांची जोडी झळकली असती. पण कधी सिनेमातील कास्ट बदलण्यात आली तर कधी सिनेमावर बंदी घालण्यात आली.
अशाच एका सिनेमापैकी एक म्हणजे ‘साहब बीवी और गुलाम’ सिनेमा. दिग्दर्शिका दिपा मेहता सिनेमाचं दिग्दर्शन करणार होत्या. सिनेमासाठी सलमान – ऐश्वर्या यांची जोडी ठरवण्यात आली. कारण तेव्हा सलमान – ऐश्वर्या यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरावर होत्या. पण काही कारणामुळे सिनेमाची कास्ट बदलण्यात आली.
सिनेमात सलमान सोबत ऐश्वर्या हिच्या जागी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला कास्ट करण्यात आलं. त्यांच्यासोबतच विद्या बालन आणि जॉन अब्राहम यांची देखील महत्त्वाची भूमिका होती. पण सिनेमा कधी तयार झालाच नाही.
‘खामोशी’ सिनेमात देखील सलमान सोबत ऐश्वर्या होती. राकेश रोशन यांनी दोघांमधील केमिस्ट्री दाखवण्याची जबाबदारी घेतली. राकेश रोशन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार होते. सलमान आणि ऐश व्यतिरिक्त, खामोशी सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये अतुल अग्निहोत्री, आयशा झुल्का आणि अनुपम खेर यांची नावे देखील होती. पण सिनेमाचं काम पूर्ण झालंच नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List