सोनू निगमवर FIR दाखल, कनेक्शन थेट पहलगाम हल्ल्याशी, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Police Complaint Filed Against Sonu Nigam: बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सोनू निगन याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. भाषांमध्ये गाणी गात गायकाने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आतापर्यंत अनेक गाण्यांनी सोनू निगम याने स्वतःच्या आवाजात गायले आहेत. आपल्या आवाजातून चाहत्यांनी मंत्रमुग्ध करणारा सोनू निगम आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याला कारण देखील तसं आहे. बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टनंतर सोनू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यांच्या विरोधात FIR देखील दाखल करण्यात आला आहे.
कॉन्सर्टमध्ये सोनूने केलेल्या वक्तव्यामुळे कन्नड समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. एका कन्नड समर्थकाने सोनू विरोधात FIR दाखल केला आहे. ज्यामुळे आता गायकाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोनू निगम याने कन्नड चाहते आणि पहलगाम येथील हल्ल्याबद्दल वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सोनू निगम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सांगायचं झालं तर, बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये सोनू निगम गाणी गात होता. तेव्हा एक चाहत सतत गायकावर कन्नडमध्ये गाणं गाण्यासाठी दबाव टाकत होता. अशात सोनूने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली नाही कारण चाहते त्याला धमकी देत होता. यानंतर सोनू निगम याने जे वक्तव्य केलं. ज्यामुळे आता वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
A post shared by Bhoomi 2024 by Salim – Sulaiman (@bhoomi_salimsulaiman)
कन्नड समुदायानं सोनूचं विधान अपमानास्पद मानलं
कॉन्सर्ट दरम्यान सोनू म्हणाला, ‘हेच कारण आहे, ज्यामुळे पहलगाम याठिकाणी युद्ध झालं आहे..’ सोनू निगमच्या या वक्तव्यानंतर कन्नड समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. गायकाने एका साध्या कन्नड गाण्याच्या मागणीचा संबंध पहलगाममधील दहशतवादी घटनेशी जोडला, ज्याला लोकांनी असंवेदनशील आणि अनावश्यक म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List