मिशन अॅडमिशन – ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांतही आता अकरावी प्रवेश ऑनलाइन

मिशन अॅडमिशन – ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांतही आता अकरावी प्रवेश ऑनलाइन

राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया करून घेतली जाणार आहे. त्यासाठी येत्या 29 व 30 एप्रिल आणि 2 मे या दिवशी संबंधितांनी नौरोसजी वाडिया महाविद्यालयात उपस्थित राहावे, अशा सूचना पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब साहेब कारेकर यांनी दिल्या आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयामधील अकरावी प्रवेशासाठी राबविली जाणारी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया आता ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयासाठी राबविण्याचे निश्चित झाले आहे. त्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला उपस्थित राहणाऱ्या माध्यमिक शाळांच्या प्रतिनिधींनी कोणती कागदपत्रे घेऊन यावीत, याबाबतची यादीच शिक्षण विभागाने दिली आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी शिबिरास वेळेत उपस्थित राहावे. सकाळी साडेदहानंतर आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी होणार नाही याची नोंद घ्यावी, असे कारेकर यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, पुरंदर, हवेली, मुळशी या तालुक्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांनी 29 एप्रिल रोजी वाडिया महाविद्यालयात कार्यशाळेसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तर, इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर या तालुक्यांतील महाविद्यालयांनी 30 एप्रिल रोजी, तर जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ या तालुक्यांतील कनिष्ठ महाविद्यालयांनी 2 मे रोजी वाडिया कॉलेजच्या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे सूचित करण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीसाठी कव्हरिंग पत्र, तपासणी सूची, शासनमान्यता, प्रथम मान्यता, अंतिम मान्यता आदी कागदपत्रे घेऊन यावीत, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चिंचवडला चाकूने भोसकून अल्पवयीन मुलीची हत्या, दोनजण अटकेत चिंचवडला चाकूने भोसकून अल्पवयीन मुलीची हत्या, दोनजण अटकेत
दुचाकीवरून आलेल्या दोनजणांनी घरासमोर थांबलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करून तिचा खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री...
Donald Trump on India pakistan पापा ने व्यापार बंद करने की धमकी देकर वॉर रुकवा दी!
शस्त्रसंधीच्या 43 तासांनी उघडली 32 विमानतळे
दहशतवाद संपवा, नाहीतर पाकिस्तानचा विनाश अटळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
याचना नही, अब रण होगा… तिन्ही दलांनी ठणकावून सांगितले
पाकिस्तानशी संघर्षात अमेरिकेची मदत का घेतली? शरद पवार यांचा सवाल
Virat Kohli क्रिकेटचा राजा निवृत्त झाला… विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती