दहशतवाद संपवा, नाहीतर पाकिस्तानचा विनाश अटळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
‘ऑपरेशन सिंदूर’ हे फक्त नाव नाही तर देशातील कोटय़वधी जनतेचे प्रतिबिंब आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नाही तर केवळ स्थगित केले आहे. त्यामुळे यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास चोख उत्तर दिले जाईल. दहशतवाद संपवा, नाहीतर पाकिस्तानचा विनाश अटळ आहे, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. दहशतवाद सुरू असताना चर्चा होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाही. तसेच पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. जर पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती फक्त दहशतवाद आणि ‘पीओके’वरच होणार. हिंदुस्थानला अण्वस्त्र्ााच्या आडून ब्लॅकमेल करू नका, असेही पंतप्रधानांनी सुनावले.
पाकिस्तानसोबत युद्धबंदी झाल्यानंतर 51 तासांनी सोमवारी रात्री 8 वाजता नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. आपल्या 22 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदीपर्यंतच्या घडामोडींची माहिती देशवासीयांना दिली.
भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान म्हणाले, हिंदुस्थानी लष्कर, सैन्यदल, निमलष्करी दल, गुप्तचर यंत्रणा, वैज्ञानिक या सगळ्यांना देशवासीयांतर्फे सॅल्यूट करतो. आपल्या वीर जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे लक्ष्य साध्य करण्यासाठी असीम शौर्य गाजवले. त्यांच्या साहस, पराक्रमाला आज आपल्या देशातील माता-भगिनींना समर्पित करतो.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा
दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्याचे लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले. आज प्रत्येक दहशतवादी संघटनांना, त्यांच्या आकांना माहीत झाले आहे की आपल्या माता-भगिनींच्या कपाळावरचे पुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे फक्त नाव नाही. देशातील कोटय़वधी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. 6 मेची मध्यरात्र, 7 मेची सकाळ जगानेही प्रतिज्ञा काय परिणाम करते हे पाहिले आहे, असे मोदी म्हणाले.
100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा
हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डय़ांवर आणि त्यांच्या प्रशिक्षण पेंद्रांवर अचूक हल्ले केले. हिंदुस्थान इतका मोठा निर्णय घेऊ शकेल याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. या हल्ल्यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला, असे त्यांनी सांगितले.
बहावलपूर, मुरीदके हे दहशतवादी विद्यापीठ
बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवादी अड्डे हे जागतिक दहशतवाद्यांची एक प्रकारची विद्यापीठे राहिली आहेत. अमेरिकेतील 9/11, लंडन टय़ूब बॉम्ब स्पह्ट असो पिंवा हिंदुस्थानातील दहशतवादी हल्ले s, हे सर्व या दहशतवादी तळांशी जोडलेले आहेत. हिंदुस्थानने दहशतवाद्यांचे हे मुख्यालये उद्ध्वस्त केले, असे मोदी यांनी सांगितले.
पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्र्ाs पत्त्यासारखे कोसळले
हिंदुस्थानचा दहशतवादाविरुद्धच्या कारवाईला पाठिंबा देण्याऐवजी पाकिस्तानने हिंदुस्थानावरच हल्ले सुरू केले. आपले गुरुद्वारा, मंदिर, घरे, शाळा, कॉलेजला टार्गेट केले. या हल्ल्यांना हिंदुस्थानने सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्र्ाs पत्त्यासारखे कोसळले. हिंदुस्थानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना हवेतच नष्ट केले. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या एअरबेसचे नुकसान केले. पाकिस्तानच्या छातीवरच हल्ला केला, असे मोदी यांनी सांगितले.
दहशतवादाला आश्रय देणारे सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार एकच
युद्धभूमीवर पाकिस्तान प्रत्येक वेळी पराभूत झाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने एक नवीन आयाम जोडला आहे हे स्पष्ट करताना मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. पहिले म्हणजे जर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर त्याला हिंदुस्थान आपल्या पद्धतीने, आपल्या अटींवर चोख उत्तर देईल. दुसरे म्हणजे हिंदुस्थान कोणतेही अण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही. हिंदुस्थान दहशतवादी अड्डय़ांवर निर्णायक हल्ले करेल. तिसरे म्हणजे दहशतवादाला आश्रय देणारे सरकार आणि दहातवादाचे सूत्रधार यांना वेगळे घटक म्हणून हिंदुस्थान पाहणार नाही, असा इशारा मोदी यांनी दिला.
पाकिस्तानने आपल्या डीजीएमओशी संपर्क केला
जबरदस्त मार खाल्ल्यानंतर 10 मे रोजी दुपारी पाकिस्तानी सैन्याने हिंदुस्थानच्या डीजीएमओशी संपर्क केला आणि यापुढे कोणत्याही दहशतवादी कारवाया होणार नाही, असे सांगितले. त्यावर हिंदुस्थानने विचार केला, अशी माहितीही मोदी यांनी दिली.
ना कश्मीर, ना ट्रम्प यांचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख टाळला. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी आपल्यामुळे झाल्याचा दावा त्यांनी केला. या मध्यस्थाबद्दल मोदी यांनी अवाक्षरही काढले नाही किंवा कोणतीही भूमिका मांडली नाही. विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरेही मोदी यांनी दिली नाहीत.
हिंदुस्थानचे धोरण स्पष्ट
हिंदुस्थानचा दृष्टीकोन, धोरण अगदी स्पष्ट आहे. दहशतवादी कारवाया आणि चर्चा एकत्र चालू शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही. तसेच पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. जागतिक समुदायालादेखील सांगू इच्छितो की, जर पाकिस्तानशी कोणतीही चर्चा झाली तर ती फक्त दहशतवाद आणि पीओकेवचर असेल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक समाज, वर्ग, राजकीय पक्ष एकत्र आले
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जी क्रूरता दाखवली त्यामुळे अवघ्या जगाला धक्का बसला. निर्दोष नागरिकांना धर्म विचारून त्यांच्या कुटुंबीयांसमोर, मुलांसमोर निर्दयीपणे ठार मारले. या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक समाज, वर्ग, सर्व राजकीय पक्ष एकमताने दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी उभे ठाकले. सर्वजण एकत्र आले, असे मोदी यांनी सांगितले.
दहशतवादी कारवाया आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाही. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List