पाकिस्तानशी संघर्षात अमेरिकेची मदत का घेतली? शरद पवार यांचा सवाल

पाकिस्तानशी संघर्षात अमेरिकेची मदत का घेतली? शरद पवार यांचा सवाल

पाकिस्तानसोबतच्या संघर्षात अमेरिकेची मदत घेण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न विचारला तर पेंद्र सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे नमूद करतानाच आमचे मुद्दे आम्ही सोडवू, तिसऱया देशाचा हस्तक्षेप चालणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. शिमला करारानुसार हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील प्रश्नांमध्ये इतर कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही, याचीही आठवण त्यांनी करून दिली.

गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही, पण त्यात किती माहिती दिली जाईल हे सांगता येत नाही. कारण संरक्षणाशी संबंधित माहिती गोपनीय ठेवावी लागते. अधिवेशन बोलवायचे तर बोलवा, त्यापेक्षा सर्वपक्षीय बैठक बोलवून संरक्षण अधिकाऱयांकडून त्यात माहिती देण्यात यावी, असे शरद पवार म्हणाले.

शिमला करार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार भुत्तो यांच्यात झाला होता. त्यात दोन्ही देशांनी आपल्यातील प्रश्नात तिसऱया देशाचा हस्तक्षेप होऊ द्यायचा नाही यावर शिक्कामोर्तब केले होते. आता पहिल्यांदाच अमेरिकेच्या अध्यक्षांनी सार्वजनिकरीत्या शस्त्रसंधी जाहीर केली, हे ठीक नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोक्यावर टक्कल, बाहेर आलेली ढेरी, सलमानचा धक्कादायक व्हिडीओ समोर, 6 पॅकअ‍ॅब्सवरून भाईजान ट्रोल! डोक्यावर टक्कल, बाहेर आलेली ढेरी, सलमानचा धक्कादायक व्हिडीओ समोर, 6 पॅकअ‍ॅब्सवरून भाईजान ट्रोल!
बॉलिवूडमधील सेलिब्रिटी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतच असतात. त्यात सलमान खानचे नाव तर अस नुकताच सलमान खानचा एक...
काळे की पांढरे? तुमच्या आरोग्यासाठी ‘हे’ तिळ ठरू शकतात अमृतासमान!
Chandrapur News : दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू
Chandrapur ट्रक व टाटा मॅजिकच्या अपघातात दोन जण ठार, 16 जण गंभीर जखमी
भाजपने ट्रम्प पुढे शरणागती पत्करली, त्यामुळे त्यांना ‘डोनाल्ड जत्रा’ भरवावी लागेल; संजय राऊत यांनी फटकारलं
Jalana News – डबल मर्डरने बदनापूर हादरले, कौटुंबिक वादातून बाप-लेकाची निर्घृण हत्या
हिंदुस्थानी सैन्याला आणखी चार दिवस मिळाले असते तर, POK सोबत कराची आणि लाहोरही घेतलं असतं – संजय राऊत