Yavatmal News – मुलगी IAS झाली, आनंद गगनात मावेना; सेलिब्रेशन करताना बापाला हृदयविकाराचा झटका

Yavatmal News – मुलगी IAS झाली, आनंद गगनात मावेना; सेलिब्रेशन करताना बापाला हृदयविकाराचा झटका

लाडकी लेक आयएएस झाली अन् बापाला आभाळ ठेंगणं झालं. मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी बापाने मोठा कार्यक्रम आयोजित केला. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. लेकीच्या यशाचं सेलिब्रेशन सुरु असतानाच वडिलांना हृदयविकाराचा झटका आला अन् ते कायमचे दुरावले. यामुळे खंदारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रल्हाद खंदारे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वागद ईजार येथे ही हृदयद्रावक घटना घडली.

प्रल्हाद खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते. त्यांची मुलगी मोहिनी यूपीएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. मोहिनी हिची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली. लेक आयएएस अधिकारी झाल्याने बापाला आनंद गननात मावेना.

मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी खंदारे कुटुंबीयांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नातेवाईक, मित्रमंडळी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सेलिब्रेशनदरम्यान खंदारे यांना हृदविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काही क्षणात खंदारे कुटुंबीयांच्या आनंदावर पाणी फेरले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पंतप्रधान मोदी हिंमत दाखवा, पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा – कपिल सिब्बल पंतप्रधान मोदी हिंमत दाखवा, पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा – कपिल सिब्बल
पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही हिंमत दाखवा आणि पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, असं राज्यसभा खासदार कपिल सिब्बल म्हणाले आहेत. आज...
निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं
बिग बींनी सोडला होता भारत, 6800 किमी दूर असलेल्या या देशात झाले स्थायिक
पाकड्यांच्या कुरापती सुरुच, पंतप्रधानांच्या भाषणानंतर सांबा सेक्टरमध्ये पुन्हा ड्रोन दिसले
IPL 2025 – आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार सामने
पापाने व्यापार बंद करनेकी धमकी देकर वॉर रुकवा दी, संजय राऊत यांचा निशाणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी