पहलगाम हल्ल्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे; विजय वडेट्टीवार यांची मागणी

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे; विजय वडेट्टीवार यांची मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे, असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. अशा प्रकारचे हल्ले हे सरकारचे अपयश स्पष्ट करतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

दशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केल्याचा दावा चुकीचा असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो. या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करावी. या प्रकारास इतर कोणताही रंग देऊ नये, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्लाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती? 200 किलोमीटरपर्यंत दहशतवादी कसे आले? तुमच्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? सुरक्षेत चूक कशी झाली? यावर विचार केला पाहिजे. या प्रकरणात दुसरीकडे लक्ष घेऊन जाणे चुकीचे आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.

विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या वादावर बोट ठेवत सांगितले की, अलीकडे गोंधळी सरकार आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांच्या मतदारसंघात जातो आणि हिंदूत्त्व सांगतो. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, पाकिस्तानचा एकही नागरीक महाराष्ट्रात नाही. दुसरीकडे नगरविकास खात्याचे मंत्री म्हणतात, 107 पाकिस्तानी सापडत नाही. इतका समन्वयाचा अभाव दिसत आहे. यावरुन हे सरकार किती गोंधळलेले हे दिसत आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;