महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, एकीकडे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, दुसरीकडे गारपीटचा अंदाज

महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, एकीकडे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, दुसरीकडे गारपीटचा अंदाज

महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल होणार आहे. राज्यात उष्णतेचा अलर्ट दिला आहे. त्याचवेळी काही भागांत गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाचा तडाखा अनुभवताना पावसाचे संकटही राज्यावर असणार आहे. मुंबईतील तापमानात वाढ होत आहे. तसेच मुंबईतील काही भागांमध्ये हलक्या सरी कोसळण्याच्या अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या वर आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशावर पोहचले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना 27 एप्रिलला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी दिला आहे. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना 28 एप्रिलला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

नागपुरात गेल्या चार दिवसांपासून पारा 44 अंशावर आहे. वातावरणातील कोरडेपणामुळे उन्हाची तीव्रता अधिक आहे. 26 ते 29 एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरणामुळे नागपुरातील तापमानात एक किंवा दोन अंशाची घसरण होण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपुरात 45.4 आणि अकोल्यात 45.1 अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदविण्यात आले.

विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्ण व दमट हवामान राहील. तसेच पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर आणि नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपीट होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. राज्याच्या इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठवाड्यातील तापमानाचा पारा देखील 42 ते 43 अंशावर गेला. उन्हामुळे राज्यातील धरणामधील जलसाठा कमी होत आहे. मराठवाड्यातल्या सर्व लघु मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. मराठवाड्यातील 142 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अक्कलकोट तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील आंबा, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;