काकासाहेब म्हस्के कॉलेजची जागा अखेर मालकाच्या ताब्यात, परीक्षेच्या तोंडावर कॉलेज बंद; 900 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

काकासाहेब म्हस्के कॉलेजची जागा अखेर मालकाच्या ताब्यात, परीक्षेच्या तोंडावर कॉलेज बंद; 900 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

भाडेकराराबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या विरोधात निकाल गेल्याने न्यायालयाच्या आदेशाने बोल्हेगाव उपनगरातील मनमाड रस्त्यालगत असलेल्या काकासाहेब म्हस्के मेडिकल व नर्सिंग कॉलेजची जागा बेलीफ व एमआयडीसी पोलिसांच्या बंदोबस्तात संकुलातील सर्व महाविद्यालये, हॉस्टेल, हॉस्पिटल, कार्यालय, कॅन्टिंग खाली करून जागेचा ताबा घेण्यात आला. दरम्यान, संकुलात सुमारे 900 विद्यार्थी शिकत असून, ऐन परीक्षेच्या तोंडावर कॉलेज बंद झाल्याने त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. जागामालक अनिल जाधव यांनी ही जागा ताब्यात घेतली आहे.

काकासाहेब म्हस्के कॉलेजने ही जागा भाडेतत्त्वावर घेतली होती. या भाडेकराराबाबत सन 2005 पासून न्यायालयात वाद सुरू होता. 2018 मध्येच न्यायालयाने कॉलेजची जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महाविद्यालयाकडून हे आदेश पाळले गेले नव्हते. यंदाही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते आणि शिक्षण सुरू होते. मार्च 2025 मध्ये न्यायालयाने पुन्हा आदेश देत म्हस्के कॉलेजने जागा रिकामी करून ती अनिल जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर 17 एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्तात सदर जागा ताब्यात घेण्यात आली. यावेळी अचानकपणे कॉलेज व वसतिगृह रिकामे करण्याचे सांगण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही !

कॉलेज प्रशासनाने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, गुरुवारी काही लोकांनी कॉलेजमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे आणि भविष्यातही घेणार आहोत. जो काही गोंधळ झाला, त्याचे व्यवस्थापन आमच्याकडून केले जात आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;