महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाही तर… संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट काय?

महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाही तर… संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट काय?

महाराष्ट्र आणि मराठीला हिंदीपासून धोका नाही तर गुजरातीपासून धोका असल्याचा मोठा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला. संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठीविषयी टिप्पणी केली होती. त्यांनी मुंबईतील विविध भागात वेगवेगळी भाषिक गट असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता हिंदीचे सक्तीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता मनसे आणि उद्धव ठाकरे गटात मराठीवरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नाव न घेता पुन्हा एकदा निशाणा साधला.

मनसेवर साधला निशाणा

काल खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नाव न घेता सागर बंगल्यावरून भाषिक वादासाठी सूत्र फिरल्याचा दावा केला होता. तर आज ही त्यांनी मनसेचे नाव न घेता पुन्हा निशाणा साधला. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी, हिंदी आणि इतर भाषांचा वाद घालण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला.

राज ठाकरे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. मराठी-हिंदी वाद चिघळत चालला आहे, असा प्रश्न प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी केल्यावर राऊतांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. हे सर्व ठरवून चाललं आहे, असे ते म्हणाले. महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी कोणता वाद निर्माण करता येईल, याच्यावर ‘कॅफे’ मध्ये खल झाला, असा चिमटा त्यांनी मनसेला काढला.

मराठीला धोका गुजरातीपासून

मुंबईत मराठीत पाहिजे यामध्ये कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नसल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका कुणापासून असेल तर हिंदीपासून नाही तर गुजरातीपासून आहे, असा दावा राऊत यांनी पत्र परिषदेत केला. लक्षात घ्या मराठी आणि महाराष्ट्राला सर्वाधिक धोका गुजराती लॉबीपासून आहे, असे त्यांनी पुन्हा सांगितले. संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्यात आल्याचा घणाघात त्यांनी घातला. भाजपाला वाईट वाटेल म्हणून त्याच्यावर कोणीच काही बोलत नसल्याचा थेट आरोप राऊतांनी केला. या मुद्दावर कॅफेत चर्चा होत आहे का? असा खोचक टोलाही त्यांनी मनसेला लगावला.

हिंदी सक्तीचे शैक्षणीक धोरणा पुरते मर्यादित आहे परंतु हा वाद पालिका निवडणुकीसाठी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. घाटकोपरची भाषा गुजराती सांगतात तेंव्हा हे का बोलत नाही, असा टोला त्यांनी लगावला. भाषेची सक्ती करायाची नाही, दक्षिणेतील राज्यकर्ते हे कटवट आहे. परंतु आमचे राज्यकर्ते गुलाम आहेत, असे घणाघात संजय राऊत यांनी घातला.

राज ठाकरे शहा मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात. शिंदे आणि त्यांची टोळी कोणत्या भाषेत शहा, मोदींशी बोलतात. ज्यांचे इंग्रजीचे वांदे आहेत, त्यांना हिंदीचा आधार घ्यावा लागतो. मराठी ही आई आहे तर इतर भाषा मावश्या असल्याचे राऊत म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आई गं काय गोड दिसतीयेस…, प्राजक्ता माळीच्या कातील अदा, चाहत्यांचा नजरा हटेना आई गं काय गोड दिसतीयेस…, प्राजक्ता माळीच्या कातील अदा, चाहत्यांचा नजरा हटेना
अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आपल्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या नवनवीन अंदाजात दिसतेय.आता...
‘चीप, छपरी…’, अंकिता लोखंडे आणि निया शर्मा पुन्हा एकदा डान्सवरून ट्रोल, तर भारती सिंगचं होतंय कौतुक
लग्न ठरताच पतीचे निधन, आयुष्यभर राहिली अविवाहित; ही मराठमोळी अभिनेत्री विधवेसारखे जगली आयुष्य
शिल्पामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त…, प्रसिद्ध उद्योजकाच्या पहिल्या बायकोची खंत
दोनदा घटस्फोट झालेल्या अभिनेत्यासोबत लग्न; मराठी अभिनेत्री पतीसह श्रीलंकेत करतेय सुट्टी एन्जॉय
शौचास जाण्याआधी पाणी पिणे का महत्वाचे? जाणून घ्या फायदे
या ५ लोकांनी ‘धने घातलेले पाणी’ अजिबात पिऊ नये, अन्यथा होतील दुष्परिणाम !