शौचास जाण्याआधी पाणी पिणे का महत्वाचे? जाणून घ्या फायदे

शौचास जाण्याआधी पाणी पिणे का महत्वाचे? जाणून घ्या फायदे

Benefits Of Drinking Water Before Pooping: पाणी आपल्या जीवनाचा आवश्यक भाग आहे. मानवी शरीराला पाण्याची मोठी गरज असते. पचनक्रिया चांगली होण्यात पाण्याची भूमिका महत्वाची असते. पाणी पचनतंत्र चांगले ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर शौचास जाण्याआधी पाणी प्यावे. यामुळे मलप्रवाह बाहेर पडण्यात अडचण येत नाही आणि बद्धकोष्ठतेची समस्या जाणवत नाही. शौचास जाण्यापूर्वी पाणी घेतल्याने काय फायदे होतात? त्याचा विचार कधी केला का?

मानवाची पचनसंस्था पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते. अन्नाचे विघटन करण्याच्या कामात पाणी मोलाची भूमिका बजावतो. पोषक तत्वे शोषण्यास आणि मल मऊ करण्यास पाण्यामुळे मदत मिळते. यामुळे तुम्ही शौचापूर्वी पाणी प्यायले तर ते अनेक प्रकारे फायदे मिळतात.

  1. पाणी मल मऊ करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर आतडे मलातून पाणी शोषून घेतात. त्यामुळे मल कडक होते. त्यामुळे शौचालयात अडचण निर्माण होते. सकाळी पाण्याच्या सेवनामुळे आतडे हायड्रेट असते. त्यामुळे मल नरम होऊन सहज बाहेर पडते.
  2. सकाळी गरम पाणी घेतल्याने आतडे सक्रीय होतात. पचनतंत्राला काम सुरु करण्याचे निर्देश त्यामुळे आतड्यांना मिळतात. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांच्यासाठी हा फायदेशीर पर्याय आहे.
  3. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर निघतात. कारण रात्रभरात अनेक विषारी घटक शरीरात तयार झालेले असतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी घेतल्याने शरीर डिटॉक्स (शरीरातील विषारी पदार्थ किंवा हानिकारक गोष्टी काढून टाकणे) होते. त्यामुळे तुम्हाला ताजेपणा वाटतो.
  4. पाण्याच्या सेवनामुळे चयापचय क्रिया लवकर होते. त्यामुळे पचनसंस्था सुधारते. पर्यायाने वजन कमी होण्यास मदत मिळते. शरीरातील चरबी कमी होते.
  5. अ‍ॅसिडीटीची समस्या असल्यावर पोट फुगलेले वाटते. पोटफुगी किंवा अ‍ॅसिडीटीचा त्रास होत असेल तर शौचास जाण्यापूर्वी पाणी पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे पोटातील आम्ल नियंत्रित राहते आणि पचनक्रिया सुधारते.

पाणी पिण्याची योग्य पद्धत

कोमट किंवा गरम पाणी पिणे आतड्यांसाठी चांगले असते. त्यामुळे आतडे सक्रीय असतात. पचनक्रिया चांगली होते. कोमट पाण्यात निंबू किंवा मधाचा वापर केल्यावर डिटॉक्सिफिकेशन वेगाने होते. नियमित पाणी सेवनाची सवय लावल्यावर तुम्हाला शरीरात सकारात्मक बदल दिसतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल