‘चीप, छपरी…’, अंकिता लोखंडे आणि निया शर्मा पुन्हा एकदा डान्सवरून ट्रोल, तर भारती सिंगचं होतंय कौतुक
हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधील मैत्रिणींची प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेत्री निया शर्मा आणि अंकिता लोखंडे. ही जोडी टीव्हीवरील लोकप्रिय सून राहिल्या आहेत. आणि खऱ्या आयु्ष्यात लोकप्रिय मैत्रिणींची जोडी देखील. कोणताही कार्यक्रम असो या दोघी नेहमी एकत्र दिसतात. चाहत्यांनाही ही जोडी पाहायला आवडते. पण ही जोडी जेवढी लोकप्रिय आहे तेवढीच ट्रोलही होते.
निया आणि अंकिताचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल
दोघींचेही डान्स व्हिडिओ अनेक वेळा व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एकदा निया आणि अंकिताचा एक डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पण या डान्स व्हिडीओमुळे या दोघींना ट्रोलही तेवढंच केलं जात आहे.
बर्थडे पार्टीतील डान्स व्हिडीओमुळे ट्रोल
हा व्हिडीओ समर्थ जुरैलच्या वाढदिवसाच्या पार्टीतील आहे. ‘लाफ्टर शेफ’ मध्ये लोकांना हसवणारे समर्थ जुरैलने नुकताच त्याचा 25 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या पार्टीला अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यादरम्यान अंकिता लोखंडे आणि निया शर्माही तिथे पोहोचल्या. त्यांच्या आकर्षक पोशाखांनीच नव्हे तर त्यांच्या डान्सने लोकांचे लक्ष वेधून घेतलं. पार्टीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात अंकिता आणि नियाच्या डान्सची सर्वाधिक चर्चा होत आहे.
बोल्ड डान्सस्टेप्स पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
अंकिता आणि नियाने बादशाहच्या वखरा स्वॅग या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या या गाण्यावरील बोल्ड डान्सस्टेप्स पाहून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. नेटकरी त्यांच्या डान्सवर कमेंट करून ट्रोल करत आहेत. पण अभिनेत्रींना काही लोकांकडून पाठिंबाही मिळाला आहे.
तर… भारती सिंगचे कौतुक
या पार्टीतील अंकिता लोखंडेचे आणखी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण त्यापैकी एका व्हिडिओमध्ये ती भारती सिंगसोबत नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक भारती सिंगचे मात्र कौतुक करत आहेत. तिने केलेला पेहराव आणि डान्स पाहून सर्वांनी तिचं कौतुक केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List