बेकायदा पिस्तूल बागळणाऱ्या दोघांना साताऱ्यात अटक

बेकायदा पिस्तूल बागळणाऱ्या दोघांना साताऱ्यात अटक

बेकायदा गावठी कट्टा (पिस्तूल) बाळगल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना मोळाचा ओढा येथून अटक केली. त्यांच्याकडून सव्वा लाखाचे पिस्तूल, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रवि रवींद्र जाधव (वय 23), रेवणसिद्ध भीमाअण्णा पुजारी (वय 27, दोघे रा. भुईंज, ता. वाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दुचाकीवर असणाऱ्या दोघांकडे पिस्तूल असल्याची व हे संशयित मोळाचा ओढा ते करंजे नाका या परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली. मोळाचा ओढा येथे दोघे पोलिसांना संशयितरीत्या दिसल्यानंतर त्यांनी थांबण्यास सांगितले. मात्र, पोलिसांना पाहताच पळून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले. संशयितांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे पिस्तूल सापडले. पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पिस्तूल व दुचाकी असा सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे, पोलीस सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, जोतिराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;