बजाज ऑटोचे मधुर बजाज यांचे निधन

बजाज ऑटोचे मधुर बजाज यांचे निधन

बजाज ऑटोचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मधुर बजाज  (63) यांचे आज ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले.  प्रकृतीच्या कारणास्तव बजाज यांनी 24 जानेवारी 2024 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

मधुर बजाज यांनी सुरुवातीचे शिक्षण डेहराडून येथील दून स्कूलमधून घेतले. 1973 मध्ये मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमधून बी.कॉम. केले. 1979 मध्ये त्यांनी आयएमडी, लॉसाने येथून एमबीए पदवी प्राप्त केली. त्यांना इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी ऑफ इंडियाने ‘विकास रतन’ पुरस्काराने सन्मानित केले. मधुर बजाज यांचा उद्योग आणि सामाजिक उपक्रमांमध्ये मोठा सहभाग होता. त्यांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड ऑग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष म्हणून काम केले. ते कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे राष्ट्रीय परिषदेचेही सदस्य होते.

मराठवाडय़ातील वाळूजमध्ये बजाज ऑटो कंपनीचा प्रकल्प उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कामगारांच्या भावना ते  समजून घेत होते, अशा  शब्दांत भारतीय कामगार संघटनेचे सरचिटणीस, शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचीक यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;