Rahuri news – किरकोळ वाद विकोपाला; माजी नगराध्यक्ष कदम यांच्यावर खुनी हल्ला, देवळाली प्रवरात तणाव

Rahuri news – किरकोळ वाद विकोपाला; माजी नगराध्यक्ष कदम यांच्यावर खुनी हल्ला, देवळाली प्रवरात तणाव

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात सुरू असलेला वाद वाद मिटवण्यासाठी गेलेले देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. लोखंडी पाईपने डोक्यात हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे देवळाली प्रवरा परिसरात खळबळ उडाली आहे.

बुधवारी रात्री विश्वकर्मा चौकात तरुणांतील दोन गटांत शाब्दिक चकमक उडाली. गल्लीतील काही समजदार मंडळींनी येऊन वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याच अंगावर जात शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याची माहिती समजताच, वाद मिटवण्यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम आले होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारण्यात आला. घटनास्थळावरून कदम यांना राहुरी फॅक्टरी येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयाबाहेर सत्यजित कदम यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर कदम यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.

माजी आमदार चंद्रशेखर कदम, सागर बेग यांसह राजकीय व सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. यावेळी हल्ला करणाऱ्या ‘त्या’ तरुणांना तातडीने अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आमच्या शेपटावर पाय दिल्यास सोडत नाही – चंद्रशेखर कदम

हल्ल्याच्या घटनेनंतर माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यासह मोठा जनसमुदाय जमला होता. शहरात बाबूराव पाटील यात्रा सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, असे आवाहन करीत ‘आम्ही कोणाच्या शेपटावर पाय देत नाही. आमच्या शेपटावर कोणी पाय दिल्यास सोडत नाही,’ असा स्पष्ट इशारा माजी आमदार कदम यांनी दिला. यावेळी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक शिवपुजे यांच्यासमोर तक्रारी मांडत अनेकांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;