पुण्यातील तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार, मित्रासह चौघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार, मित्रासह चौघांवर गुन्हा दाखल

मूळची कर्नाटकची आणि पुण्यात आयटी कंपनीत नोकरीला असलेल्या तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर चौघांनी अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 30 लाख रुपये, दोन आयफोन उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ही घटना कांदिवली मुंबईतील फॅब हॉटेल स्प्रिंगईन, मोटारीत घडली आहे. 33 वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तमीम हरसल्ला खान (रा. कांदिवली) आणि त्याचे इतर तीन मित्र अशा चौघांविरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, फसवणूक, अपहार, धमकावून मारहाण अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, हा प्रकार कांदिवली येथे घडल्यामुळे गुन्हा पुढील तपासासाठी कांदिवली पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून 2021मध्ये आरोपी खान याच्यासोबत तिची ओळख झाली होती. खानने त्याच्या वडिलांचा मोठा बांधकाम व्यवसाय असून तो पाहत असल्याची बतावणी केली. लग्नाच्या आमिषाने खानने तरुणीला जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर कारमध्ये नेऊन पुण्यातही अत्याचार केला. तरुणीवर कारमध्ये अत्याचार करत असताना त्याने तिघा मित्रांना बोलावून घेतले. तिघांनी तरुणीवर आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केला. तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 10 लाख रुपये उकळले.

सख्ख्या बहिणींवर बलात्कार

किरकोळ वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर बलात्कार झाल्याचा प्रकार 17 मार्चला शिवाजीनगर भागात घडला आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह त्यांना मदत करणाऱ्या महिलेविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलींच्या आईने फिर्यादी दिली आहे. पीडित मुली शिवाजीनगर भागात प्लास्टिक पिशव्या, पेन, फुले विक्री करतात. दोघी सख्या बहिणी असून त्यांचे कुटुंबीय फिरस्ते आहे. दरम्यान, शाळेत निघालेल्या मुलीला धमकावून तिच्यावर तरुणाने बलात्कार केल्याची घटना नगर रस्ता भागात घडली. या प्रकरणी वाघोली 23 वर्षीय तरुणाला अटक केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;