जिल्हा परिषदेत उधळल्या नोटा, नोकरभरतीत अन्याय झाल्याचा आरोप

जिल्हा परिषदेत उधळल्या नोटा, नोकरभरतीत अन्याय झाल्याचा आरोप

पुणे जिल्हा परिषद मुख्यालयात आज चक्क नोटा उधळल्या. जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने झेडपीच्या नोकरभरतीत जिल्हा परिषदेने अन्याय केल्याचा आरोप करत, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आतील बाजूस मोकळ्या जागेत नोटा उधळताना संबंधित कर्मचाऱ्याने स्वतःच्या गळ्यातही नोटांचा हार घातला होता. उधळलेल्या दहा आणि वीस रुपयांच्या नोटांची संख्या जास्त होती.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच नोटा उधळण्याची घटना घडल्याने हा चर्चेचा विषय झाला

मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रामपंचायतीचा हा कर्मचारी असून, अनिल सिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नोटा उधळल्यानंतर काही काळ सिरसाठ हे आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. दरम्यान, दुपारी पोलिसांनी त्यांना उधळलेल्या नोटांसह ताब्यात घेतले. रिक्त जागांपैकी 10 टक्के जागा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. यानुसार या कर्मचाऱ्याचा सेवाज्येष्ठता यादीत 34 वा क्रमांक आहे. मात्र, या नोकर भरतीत सन 2021-22 या नोकर भरती वर्षात अन्याय झाल्याचा आरोप सिरसाट यांनी केला आहे.

अनिल सिरसाट यांनी ग्रामपंचायत कर्मचारी कोट्यातून झालेल्या भरतीत अन्याय झाल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी मंत्रालयातही आंदोलन केले आहे. त्यांच्यावर आंदोलनाचा गुन्हा दाखल आहे. अपात्र असूनही नियुक्ती मिळण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

विजयसिंह नलावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;