मुंबई – पुणे एक्प्रेस वेवरील प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेत 3 टक्क्यांची वाढ

मुंबई – पुणे एक्प्रेस वेवरील प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेत 3 टक्क्यांची वाढ

मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून टोलच्या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या महामार्गावर वाहनधारकांकडून घेतल्या जाणाऱ्या टोलच्या रकमेत तीन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार चारचाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागणार आहेत, तर परतीच्या प्रवासासाठी 10 रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित मोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर ही टोल दरवाढ लागू होणार आहे. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांच्या मते टोलच्या दरांमध्ये दरवर्षी 1 एप्रिल रोजी बदल केला जातो. वाहनाच्या प्रकारानुसार ही दरवाढ लागू करण्यात येते. चारचाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी टोल दरात 5 रुपयांची वाढ केली जाणार आहे, तर परतीच्या प्रवासासाठी 10 रुपये मोजावे लागणार आहेत. इतर श्रेणींतील वाहनांसाठी सरासरी 15 ते 20 रुपयांपर्यंतची टोल दरवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यांतील काही ठरावीक महामार्ग वगळता इतर रस्त्यांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे वाहनधारकांना खडतर प्रवासाचा कटू अनुभव घ्यावा लागतो. सरकारची अशा प्रकारे अनास्था असताना दरवर्षी सर्व महामार्गांवर टोलची दरवाढ का केली जात आहे, असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून केला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;