Pune Bus Rape Case – आरोपी गाडेवर तीन अतिरिक्त कलम

Pune Bus Rape Case – आरोपी गाडेवर तीन अतिरिक्त कलम

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (37) याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) तीन नव्या कलमांची वाढ करण्यात आली आहे. पीडितेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि दोन वेळा जबरदस्तीने संभोग करणे या कारणांमुळे हे कलम वाढविण्यात आले आहेत.

स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर 12 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठड़ी सुनावली होती.  बुधवारी त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार गाडेची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबत एका 26 वर्षीय पीडित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचे वीर्य, रक्त, नख आणि केस याचे नमुने संकलित करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. आरोपी आणि तक्रारदार तरुणीची डीएनए चाचणी  करण्यासाठी सॅम्पल घेतले आहेत.  या गुह्याच्या तपासात पोलिसांनी आतापर्यंत 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी आरोपीला गुह्याच्या ठिकाणी नेऊन संपूर्ण घटनाक्रमाचा तपास केला आहे. तसेच, तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला त्याच्या मूळ गावी गुनाट (ता. शिरूर) येथेदेखील नेले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;