शाळेतल्या प्रेमप्रकरणातून संसारावर वरवंटा, प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; राजगड पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

शाळेतल्या प्रेमप्रकरणातून संसारावर वरवंटा, प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; राजगड पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

शालेय जीवनातील प्रेमसंबंधांतून महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा घोटत संसारावर वरवंटा फिरविला. पतीचा मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवरून सारोळा गावच्या हद्दीत फेकून दिला. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून तिने चलाखीचा प्रयत्न केला. मात्र, राजगड पोलिसांनी मृतदेहाच्या शर्टवरील टॅगनुसार ओळख पटवून गुन्ह्याची उकल केली. याप्रकरणी महिलेसह प्रियकराला अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक राजेश गवळी उपस्थित होते.

सिद्धेश्वर बंडू भिसे (वय 40, रा. ससाणेनगर, हडपसर, मूळ रा. वडगाववाडी ता. लोहारा, जि. धाराशिव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी योगिता सिद्धेश्वर भिसे (वय 30) आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार (वय 32, रा. अंदुर, ता. तुळजापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भोरमधील सारोळा गावच्या हद्दीत नीरा नदीपात्रात पोत्यात हात-पाय बांधलेला मृतदेह 9 मार्चला आढळला होता. याप्रकरणी राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. मृतदेहाच्या अंगातील शर्टवरील टेलरच्या टॅगवरून पोलिसांनी ओळख पटविली. संबंधित टेलर टॅग लोहारा (जिल्हा धाराशिव) येथील असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी त्याची पत्नी योगिताची चौकशी केली असता, संशय बळावला. प्रियकर शिवाजी सुतार याच्या मदतीने पतीचा खुन केल्याची कबुली तिने दिली. ३ मार्चला सुतार आणि योगिता या दोघांनी मिळून सिद्धेश्वर यांचा खून केला. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गवळी, उपनिरीक्षक अजित पाटील, वृषाली देसाई, नाना मदने, मयूर निंबाळकर, सागर कोंढाळकर, अक्षय नलावडे, सचिन नरुटे, अनिकेत गुरव, समीर भालेराव, मंगेश कुंभार, चव्हाण यांनी गुन्ह्याची उकल केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;