जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या पगडीचे आज लोकार्पण; जगातील सर्वांत मोठ्या पगडीची जागतिक नोंद

जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या पगडीचे आज लोकार्पण; जगातील सर्वांत मोठ्या पगडीची जागतिक नोंद

संत तुकाराम महाराज बीजनिमित्त जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वांत मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी पार पडणार आहे.

याप्रसंगी ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अॅण्ड जीनिअस फाऊंडेशन’चे सीईओ पवनकुमार सोलंकी आणि संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट, श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’ यांनी केले आहे.

दिलीप सोनिगरा म्हणाले, ‘जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पस्पशनि पावन झालेल्या देहूनगरीमध्ये आम्ही वास्तव्य करीत आहोत. याच परिसरात आम्ही व्यवसायात स्थिर झालो आहोत. संत तुकाराम महाराजांवर आमची नितांत श्रद्धा आहे. याच सद्भावनेतून आम्ही जगातील सर्वांत मोठी पगडी तयार केली असून, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अॅण्ड जीनिअस बुकमध्ये तिची नोंद होणार आहे.’

‘ही पगडी दर्शनासाठी 10 तारखेला सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’ चिंचवड येथे ठेवण्यात येणार आहे. ही पगडी पाहण्यासाठी व दर्शनासाठी सर्वांसाठी खुली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन दिलीप सोनिगरा यांनी केले आहे.

पगडीचा घेराव हा 22 फुटांचा असून, पगडीची उंची 4 फूट आहे. या पगडीला 450 मीटर लांबीचा कपडा लागला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;