आमदार धस राजीनामा द्या, शिरूर कासार बंद

आमदार धस राजीनामा द्या, शिरूर कासार बंद

कुख्यात गुंड तथा हरणतस्कर सतीश भोसले उैर्फ खोक्याला तत्काळ अटक करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज रविवारी शिरूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच नागरिकांनी प्रचंड आक्रोश मोर्चा काढला. यावेळी सतीश भोसलेला तत्काळ अटक झालीच पाहिजे, आमदार सुरेश धस राजीनामा द्या, अशा घोषणांनी शिरूर दणाणून गेले. या मोर्चात नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.

ढाकणे कुटुंबावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिरूर कासार गावात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. सतीश भोसले उर्फ खोक्याला  अटक करण्याची आणि एसआयटी चौकशी करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली. आरोपीला वाचवण्यात आमदार सुरेश धस यांचा सहभाग असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;