स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर

स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर

शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीला धमकावून बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात फिरत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्याने पोलिसांचा गणवेश परिधान केलेले छायाचित्र पोलिसांना मिळाले असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट, अहिल्यानगर, सोलापूर, तसेच शिरूर एसटी स्थानकात आरोपी दत्तात्रय गाडे हा फिरत असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्याच्याविरुद्ध तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान,   गाडेच्या ओळखीचा एक जण पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कार्यरत आहे. गाडेने त्याचा वेश परिधान करून छायाचित्र काढल्याचे उघडकीस आले. आरोपी गाडे याच्याविरुद्ध यापूर्वी पुणे ग्रामीण, अहिल्यानगर परिसरात ज्येष्ठ महिलांना लुटण्याचे गुन्हे आहेत.

जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचे काम सुरू

डीएनए चाचणीसाठी आरोपीच्या रक्ताचे नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. गुन्हा करताना गाडेने वापरलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. ते कपडे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;