दुकानांच्या पाट्या मराठीतच लावा, शिवसेनेचे आंदोलन; 15 दिवसांची डेडलाइन

दुकानांच्या पाट्या मराठीतच लावा, शिवसेनेचे आंदोलन; 15 दिवसांची डेडलाइन

मराठी भाषेसाठी, मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्रात अनेक आंदोलने झाली, तरी आजही पुण्यात टिळक रोड व इतर भागात अनेक दुकानदारांच्या नावाच्या पाट्या इंग्रजीत आहेत. या पाट्या मराठीत लावाव्यात या मागणीसाठी पुणे शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी दुकानदारांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन पुढील पंधरा दिवसांत सर्व दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून करण्याचे तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन घेण्यात आले; अन्यथा मराठी भाषेच्या सन्मानार्थ, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शिवसेना प्रसिद्धिप्रमुख अनंत घरत, विभागप्रमुख मुकुंद चव्हाण, सूरज लोखंडे, राजेश मोरे, नितीन परदेशी, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, किशोर राजपूत, संदीप गायकवाड, पराग थोरात, मकरंद पेठकर, महिला आघाडीच्या निकिता मारतकर, वैशाली दारवटकर, अमृता पठारे, दीपाली राऊत, राणी इनामदार, शिवसेना पदाधिकारी संतोष भुतकर, राकेश बोराटे, दिलीप पोमण, अमर मारतकर, जुबेर तांबोळी, गणेश घोलप, रमेश लडकत, प्रतीक गालिंदे, नागेश खडके, संजय साळवी, नितीन दलभंजन, मुकेश दळवे, नीलेश वाघमारे, गणेश वायाळ, जुबेर शेख, किरण शिंदे, जगदीश परदेशी, तुषार भोकरे, शिवाजी मेनकरी, अमित बाबर व शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;