संगणक अभियंता मारहाण प्रकरण, कुख्यात गजा मारणे पोलिसांना शरण! मारणे टोळीविरुद्ध ‘मोक्का’

संगणक अभियंता मारहाण प्रकरण, कुख्यात गजा मारणे पोलिसांना शरण! मारणे टोळीविरुद्ध ‘मोक्का’

आयटी अभियंत्याला मारहाणप्रकरणी पुख्यात गजा मारणे टोळीविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. दरम्यान,  अंतर्गत कारवाईच्या भीतीपोटी गजा मारणे हा सोमवारी संध्याकाळी कोथरूड पोलीस ठाण्यात शरण आला. त्याची वकिली करण्यासाठी आलेल्याला पोलिसांनी पिटाळून लावले. दरम्यान, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला नेस्तनाबूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे. मारणे टोळीच्या मालमत्तांची माहिती डीडीआर करून त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओकडून मागविली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

कोथरूड परिसरात पुख्यात गजा मारणे टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केल्याची घटना 19 फेबुवारीला घडली  होती. पोलीस आयुक्त अमितेश पुमार यांनी तातडीने प्रकरणाची दखल घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी मारणे टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे. ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ, अमोल, तापकीर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौथा आरोपी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार पसार झाला आहे. या चौघांविरुद्ध यापूर्वी गंभीर गुह्यांची नोंद आहे. देवेंद्र पुरुषोत्तम जोग यांनी फिर्याद नोंदवली आहे.

मारहाण प्रकरणात टोळीचा म्होरक्या गजा मारणे याला अटक करण्यात आली. यातील आरोपींसह गुह्यासंदर्भात 74 ठिकाणी घरांची झडती घेतली. आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठी कोथरूड पोलिसांनी कागदपत्रांची मोठय़ा प्रमाणावर पूर्तता केली. पूर्ण ताकदीने या केसचा तपास सुरू आहे. मोबाईल ट्रेपिंग, ट्रफिक कॅमेरे याद्वारे तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश पुमार यांनी सांगितले.

नागरिकांच्या तक्रारींसाठी स्पेशल डेस्क

नागरिकांनो, मारणे टोळीसह इतर कोणत्याही गुंड टोळ्यांविरुद्ध आपली तक्रार असल्यास घाबरू नका. संबंधित तक्रार पोलीस आयुक्तालयातील स्पेशल डेस्ककडे करा. त्यासाठी गुन्हे शाखा उपायुक्त निखिल पिंगळे यांची नियुक्ती केली आहे. तक्रारदार नागरिकांची सुरक्षा आणि गोपनीयता ठेवण्याची आमची जबाबदारी असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;