घाटात वाहतूककोंडी… पण तो चक्क ‘उडत’ परीक्षेला पोहोचला, महाबळेश्वरमधील अजब घटना

घाटात वाहतूककोंडी… पण तो चक्क ‘उडत’ परीक्षेला पोहोचला, महाबळेश्वरमधील अजब घटना

पाचगणी, महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी असते. वीकेंडला तर रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पर्यटकांची वाढती गर्दी, त्यामुळे निर्माण झालेली वाहतूककोंडी आणि परीक्षेला होत असलेला उशीर यामुळे एका विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंग करत चक्क परीक्षा केंद्र गाठले.

साताऱ्यातील पसरणीत ही घटना घडली. समर्थ महांगडे चक्क हवेत उडत परीक्षा केंद्रावर पोचला. कामानिमित्त समर्थ पाचगणीला गेला होता. तिथे गेल्यावर समजले की परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे. मित्राने आजच पेपर असल्याचे  सांगितल्यावर पेपरला पोचता येणार नाही, या कल्पनेने समर्थला टेन्शन आले. त्याला पॅराग्लायडिंग ट्रेनर गोविंद येवले यांनी मदत केली.

 वाई पाचगणी रोडवर असणाऱ्या पसरणी घाटात वाहतूककोंडी असते. त्यामुळे समर्थपुढे कोणताही पर्याय नव्हता. समर्थने भीतभीत पॅराग्लायडिंग करण्याचा निर्णय घेतला. या प्रसंगात पॅराग्लायडिंग संस्थेच्या संस्थापकांनीही त्याला मदत केली. त्यांनी त्याला पॅराग्लायडिंग करून परीक्षा केंद्रावर सोडण्याचे ठरवले आणि सुरक्षितपणे पोचवले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;