पर्यटक तरुणाचा तोरणा गडावर मृत्यू

पर्यटक तरुणाचा तोरणा गडावर मृत्यू

तोरणा या गडावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शनिवारी म्हणजेच 8 फेब्रुवारीला ही घटना घडली. रणजीत मोहनदास शिंदे असे या पर्यटकाचे नाव आहे. हा पर्यटक मूळचा सातारा जिल्ह्यातील सोनगावचा रहिवासी होता. तो सध्या वारजे या ठिकाणी राहत होता. फजीलत खान आणि रणजीत शिंदे असे दोघेजण तोरणा गडावर गेले होते.

या दोघांनी 8 फेब्रुवारीच्या रात्री 11च्या दरम्यान तोरणा किल्ल्यावर जाण्यास सुरुवात केली होती. ते विशिष्ट अंतरावर पोहचले तेव्हा रणजीतला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतर फजीलतने रणजीतला खाली आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाशी संपर्क साधला.

पोलीस हवालदार रोहित मरभळ, युवराज सोमवंशी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोलस्कर, अनिल रेणुसे हे गडावर पोहचले. त्यांनी बेशुद्ध रणजीत शिंदेला खाली आणेपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते. त्यावेळी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका थांबली होती. डॉ. राहुल बोरसे, चंद्रकांत भोईटे, ज्ञानेश्वर हिरास यांनी शिंदेला मृत घोषित केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;