कोल्हापुरातील विमला गोयंका कॉलेजमध्ये प्रवेशपत्रात चूक प्रकरणातील, ‘त्या’ विद्यार्थ्यांनाही देता येणार बारावीची परीक्षा

कोल्हापुरातील विमला गोयंका कॉलेजमध्ये प्रवेशपत्रात चूक प्रकरणातील, ‘त्या’ विद्यार्थ्यांनाही देता येणार बारावीची परीक्षा

कोल्हापूर येथील विमला गोयंका कॉलेजने आय.टी., कॉम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स या विषयांची मंडळ मान्यता न घेता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून या विषयांचे फॉर्म भरून घेतले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर या विषयांचे हॉल तिकीट (प्रवेश पत्र) मिळाले नाही. पण या विद्यायांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या होत्या. यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राज्य मंडळाशी संपर्क करून तातडीने पाठपुरावा केला.

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात अभ्यास करावा. विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु. कॉलेजमधील बारावीच्या या सर्व मुलांची परीक्षा घेण्यात येईल. पालकांनीही मुलांना विश्वास द्यावा. फॉर्म भरायचे राहिलेल्या विद्यार्थ्यांचे अतिविशेष अतिविलंब शुल्कासह फॉर्म ऑनलाइन पद्धतीने कॉलेजमार्फत भरता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

तसेच राज्य मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दंडात्मक शुल्क आकारून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांची त्या-त्या विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्याबाबत संबंधित कॉलेजला सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित कॉलेजमधील कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याबाबतची दक्षता मंडळामार्फत घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शनिवारी (दि.8) अनेक मुलांच्या हॉल तिकिटांमध्ये चुका आढळल्यामुळे खळबळ उडाली होती.

यात शिक्षण मंडळाची चूक नाही – एकनाथ आंबोकर

■ या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे विज्ञान शाखेचे एकूण 149 विद्यार्थी असून, त्यापैकी 70 विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म कॉलेजने ऑनलाइन भरलेले नव्हते. फॉर्म भरलेल्या 79 विद्याथ्यांपैकी 26 विद्यार्थ्यांना विषयात दुरुस्ती हवी आहे. कॉलेजने प्रीलिस्ट दुरुस्तीच्या वेळी विद्यार्थ्यांच्या फॉर्ममधील माहितीमध्ये नाव, विषय, माध्यम आदी तपासून दुरुस्त्या करून घेणे अपेक्षित होते. तसेच 20 जानेवारी 2025 पासून सुधारित ऑनलाइन प्रवेश पत्र उपलब्ध करून दिलेली माहिती तपासून, आवश्यक त्या दुरुस्त्या करून घेणे अपेक्षित होते. तशी कार्यवाही कॉलेजकडून झाली नाही. या कनिष्ठ महाविद्यालयाने भरलेल्या फॉर्मनुसार बोडनि हॉल तिकीट दिली आहेत. यात शिक्षण मंडळाकडून कोणतीही चूक झालेली नाही, असे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी कळवले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;