स्टेरॉईडचे इंजेक्शन आरोग्यासाठी घातक!

स्टेरॉईडचे इंजेक्शन आरोग्यासाठी घातक!

चित्रपटांतील नायकांप्रमाणे आपली ही शरीरयष्टी मजबूत आणि पिळदार असावी, असे जिममध्ये जाणाऱ्या प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. नैसर्गिक आहार आणि व्यायाम करून शरीरयष्टी तयार होत नाही, अशा तरुणांना उत्तम शरीरयष्टीसाठी ‘स्टेरॉईड इंजेक्शन’चे आमिष काही जिमचालकांकडून दाखवण्यात येत आहे. त्यामुळे तरुणांची पावले ही आरोग्यासाठी घातक असलेल्या स्टेरॉईडकडे वळू लागली आहेत. काही जिममध्ये तरुणांना स्टेरॉईड इंजेक्शन बेकायदेशीररीत्या पुरवून त्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. स्टेरॉईडचा परिणाम तरुणांच्या हार्मोन्स आणि प्रजनन क्षमतेवर होत असून, काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जिममध्ये बेकायदा स्टेरॉईड इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी दोघांवर कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून १४ स्टेरॉईड इंजेक्शन जप्त केली होती.

चित्रपटातील नायकांप्रमाणे आपलीही शरीरयष्टी असावी, असे काही तरुणांचे स्वप्न असते. मात्र, अनेक वर्षे जिममध्ये व्यायाम केल्यावर, नैसर्गिक आहार घेतल्यानंतरदेखील पिळदार शरीरयष्टी तयार होत नाही म्हटल्यावर तरुण सप्लिमेंट्स, स्टेरॉईडच्या मागे धावू लागले आहेत. हजारो रुपये खर्च करून तरुण आरोग्यासाठी घातक असणाऱ्या स्टेरॉईडच्या इंजेक्शनचा डोस घेत आहेत. स्टेरॉईड घेतल्यानंतर काही काळातच पिळदार शरीरयष्टी होते. मात्र, त्याचे घातक दूरगामी परिणाम आरोग्यावर होण्यास सुरुवात होते.

स्टेरॉईडचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो ?

स्टेरॉईडच्या अती वापरामुळे आरोग्यावर अनेक घातक परिणाम होण्याची शक्यता असते. केसगळती, त्वचेशी निगडित असलेल्या अनेक समस्या, हाडं ठिसूळ होणे, मूत्रपिंडावर घातक परिणाम, जननेंद्रिय कमजोर होणे, यांसह अन्य घातक परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच, स्टेरॉईडचा सतत वापर केल्याने तरुणांमधील हार्मोन्स आणि प्रजनन क्षमतेवरदेखील त्याचा विपरित परिणाम दिसून येतो.

तरुणांनी व्यायाम करताना प्राधान्याने नैसर्गिक आहारावरच भर द्यावा. ज्या तरुणांना ‘बॉडीबिल्डिंग’ क्षेत्रात करिअर करायचे आहे, अशा तरुणांनीच आहारतज्ज्ञ आणि प्रशिक्षित जिम ट्रेनच्या देखरेखीखाली स्टेरॉईडचा डोस घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहारात बदल करावा. 

ललित शिवले

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;