विद्यार्थ्यांने वर्गातील मुलीची दिली सुपारी
पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याच्या रागातून एका विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गात सातवीमध्ये शिकणाऱया विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा खून करावा यासाठी दुसऱया वर्गातील एका विद्यार्थ्याला 100 रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 22 जानेवारी रोजी दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा खळबळजनक प्रकार घडला. शाळेची बदनामी होऊ नये म्हणून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाने केला. विद्यार्थिनीने घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक, वर्गशिक्षक व शिक्षिका अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List