‘जीबीएस’चे थैमान; पुण्यात ‘डब्ल्यूएचओ’चे पथक

‘जीबीएस’चे थैमान; पुण्यात ‘डब्ल्यूएचओ’चे पथक

दूषित पाण्यामुळे होणाऱया ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ने (जीबीएस) पुण्यात थैमान घातले असून, रुग्णसंख्या शंभरीपार झाली आहे. एकूण रुग्णसंख्या 101वर पोहोचली आहे. यातील 41 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत, तर 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) पथक पुण्यात दाखल झाले आहे. या पथकाने पुणे महापालिकेच्या अधिकाऱयांसह सर्वाधिक रुग्ण आढळून येत असलेल्या नांदेड गावात पाहणी केली.

आतापर्यंत नोंद झालेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 80 रुग्ण पुणे महापालिकाहद्दीतील, तर 15 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकाहद्दीतील आहेत. सहा रुग्ण इतर जिह्यांतील आहेत. पुण्यात ‘गुलेन बॅरे सिंड्रोम’चा प्रसार वेगाने होत असल्याने आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आरोग्य विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकाकडूनही जास्त रुग्णसंख्या आढळून आलेल्या परिसराची पाहणी केली जात आहे. संशयित रुग्णांचे शौच आणि रक्ताचे नमुने ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात येत आहेत. यातील काही तपासणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून, काही रुग्णांमध्ये ‘पॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ आणि ‘नोरोव्हायरस’चा संसर्ग आढळून आला आहे. तसेच विविध भागांतील पाण्याचे नमुनेही रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात असतानाही रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सोमवारी ‘डब्ल्यूएचओ’चे पथक पुण्यात दाखल झाले आहे.

उपचारांदरम्यान एकाचा मृत्यू

पुण्यातील धायरी भागात राहणाऱया एका 40 वर्षीय रुग्णाचा ‘जीबीएस’ आजाराने मृत्यू झाला आहे. तो व्यवसायाने सीए होता. हा रुग्ण 11 जानेवारी रोजी सोलापूरला गावी गेला होता. मात्र, जास्त त्रास जाणवत असल्याने 18 जानेवारी रोजी या रुग्णाला तेथील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना 25 जानेवारी रोजी संध्याकाळी या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;