सयाजी शिंदे 22 वर्षांनी पुन्हा मराठी रंगभूमीवर

सयाजी शिंदे 22 वर्षांनी पुन्हा मराठी रंगभूमीवर

रंगभूमीवर वैविध्यपूर्ण नाटकांची रेलचेल नव्या वर्षात बघायला मिळणार असताना एका सशक्त नाटकाच्या निमित्तानं मराठी रंगभूमीवर दोन अवलिया रंगकर्मी एकत्र आले आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या सकस कलाकृतींनी आणि अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी, साऊथ सिनेसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे. आपल्या अंगभूत असलेल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करत डबिंग आर्टिस्ट, अभिनय, दिग्दर्शन ते नाट्यनिर्माता अशी चौफेर मुशाफिरी करत अजित भुरे यांनी आपला वेगळेपणा दाखवून दिला आहे. या दोन कलासंपन्न कलाकारांना या नाटकाने एकत्र आणले आहे.

सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूमीवर येताहेत. या नव्या नाटकासाठी या दोन दिग्गज मान्यवरांना एकत्र आणण्याची किमया त्यांनी साधली आहे. लवकरच या नाटकाचा शुभारंभ केला जाणार आहे. या निमित्ताने अभिनेते सयाजी शिंदे २२ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत, तर नाट्यनिर्माता अजित भुरे 6 वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनाकडे वळले आहेत.

नाटकात काम करण्याच्या हेतूने मी मुंबईत आलो होतो, पुढे चित्रपटांमध्ये व्यस्त झालो. आता पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करता येणार याचा आनंद आहेच. दर 5 वर्षांनी माणूस आणि गोष्टी बदलतात असे म्हणतात. या बदलाला या नव्या नाट्यकृतींच्या माध्यमातून जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज विविध क्षेत्रात यशस्वी पद्धतीने कार्यरत असून, आता ही कंपनी ‘सुमुख चित्र’च्या माध्यमातून नाट्यक्षेत्रात काम करते आहे. सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माते निखिल जाधव सांगतात की, अभिरुचीसंपन्न कलाकृती नाट्य रसिकांसाठी आणण्याचा आमचा मानस असून, अनुभवी आणि दिग्गज कलावंतांची ही नवी नाट्यकृती नाट्यरसिकांसाठी दमदार मेजवानी असणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;