तेल मालिश… कोल्हापुरात टक्कलग्रस्तांच्या रांगा; वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील प्रकार

तेल मालिश… कोल्हापुरात टक्कलग्रस्तांच्या रांगा; वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील प्रकार

एकीकडे बुलढाण्यातील एका गावात केसगळती होऊन टक्कल पडणाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला असतानाच, दुसरीकडे वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यात चक्क केसगळती आणि टक्कलवर उपाय म्हणून एका व्यक्तीकडून ‘सिक्रेट तेल’ लावले जात आहे. हे तेल लावून घेण्यासाठी टक्कलग्रस्तांची रांग लागत आहे.

विशेष म्हणजे, याबाबत कसलेच वैद्यकीय व वैज्ञानिक प्रमाणपत्र नसतानाही ‘सलमान हेअर ट्रेनर’ नावाच्या व्यक्तीकडून हे ‘सिक्रेट तेल’ मोफत लावण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या बागेत हे तेल लावून घेण्यासाठी दररोज शेकडो टक्कलग्रस्तांची रांग लागल्याचे चित्र गेल्या चार-पाच दिवसांपासून पाहावयास मिळत आहे.

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून केसगळती आणि टक्कलवर उपाय म्हणून एक व्यक्ती अनेकांना त्याने बनविलेले ‘सिक्रेट तेल’ मोफत लावून देत आहे. विशेष म्हणजे, तो हे तेल मोफत लावून देत असल्याने दररोज मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे.

‘सलमान हेअर ट्रेनर’ नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावरून केलेले सादरीकरण पाहून अनेक टक्कलग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या महावीर गार्डन येथे रांग लावत आहेत. आतापर्यंत यामध्ये कोणाची फसवणूक झाल्याची काहीही घटना घडली नसल्याने सध्यातरी टक्कलग्रस्त तेल लावण्यासाठी गर्दी करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;