‘ई-वाहन’ खरेदीत तिपटीने वाढ, गतवर्षी 92 हजार वाहनांची नोंद

‘ई-वाहन’ खरेदीत तिपटीने वाढ, गतवर्षी 92 हजार वाहनांची नोंद

प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन खरेदीला पुणेकरांनी पसंती दिली असून 2024 या वर्षभरात पुणे आरटीओ कार्यालयात तब्बल 92 हजार 402 इलेक्ट्रीक वाहनांची नोंद करण्यात आली. 2023 साली हा आकडा ३३ हजार 960 एवढा होता. त्यामुळे गेल्यावर्षी ‘ई- वाहन’ खरेदीत 60 हजारांनी म्हणजेच तिपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पारंपरिक इंधनाला हरित इंधनाचा पर्याय निर्माण करण्यासाठी देशभरात विविध प्रयत्न केले जात आहेत. यातच राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केले. या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनधारकांना खरेदीवर विविध सवलती देण्यात येत आहेत. यामध्ये वाहन नोंदणीमध्ये आर्थिक सूट, टोलनाका आदींवर ई-वाहनधारकांना सवलत दिली जाते. यातच इंधनाचे गगनाला भिडलेले दर, यामध्ये सातत्याने होणारी वाढ या पार्श्वभूमीवर नागरिक देखील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करीत आहेत. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत इलेक्ट्रिक वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गतवर्षीय ई-वाहन खरेदीत मोठी वाढ झाली. 2023 साली पुण्यात 33 हजार 960 ई- वाहनांची नोंदणी झाली. यात 30 हजार 459 दुचाकी, तर 2 हजार 212 कारचा समावेश आहे. 138 बस आणि इतर अन्य वाहने आहेत. 2024 मध्ये वर्षभरात तब्बल 92 हजार 402 वाहनांची नोंद झाली. यात 82 हजार 228 दुचाकी, तर 6 हजार 675 कार, 630 बस आणि इतर अन्य वाहने आहेत.

पेट्रोल, डिझेल अन् सीएनजीदेखील महागला

■ पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच पर्यावरणपूरक आणि तुलनेने स्वस्त असणाऱ्या सीएनजी गॅसदरातदेखील मागील काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. गत सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने सीएनजी दरात प्रतिकिलो साडेपाच रुपयांची वाढ झाली असून सद्यःस्थितीला 89 रुपये किलोने सीएनजी उपलब्ध आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;