वाल्मीक कराडची महिलेच्या नावे बार्शीत 35 एकर शेतजमीन

वाल्मीक कराडची महिलेच्या नावे बार्शीत 35 एकर शेतजमीन

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि अवैध धंद्यांचा ‘आका’ म्हणून ओळखला जाणारा वाल्मीक कराड याची बार्शीत सुमारे दीड कोटी रुपयांची शेतजमीन असल्याचे उघडकीस आले आहे. ही शेतजमीन जाधव नावाच्या महिलेच्या नावाने जुलै २०२४ मध्ये खरेदी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही शेतजमीन वाल्मीक कराडची असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. त्यामुळे बीड, पुणे ते सोलापूर असे कराडचे कनेक्शन उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

बार्शी तालुक्यातील शेंद्री या गावात मंगल जाधव या महिलेच्या नावे चार जमिनींचा सातबारा उतारा आढळला आहे. सुमारे ३५ एकर जमीन असून, याची किंमत दीड कोटी असल्याचे सांगण्यात येते. ही जमीन पाहण्यासाठी येथे सहा-सात सालगडी ठेवण्यात आले आहेत. यातील काहीजणांना पगार न मिळाल्याने सोडून गेले असून, येथे सध्या तिघेजण काम करतात. परंतु, त्यांनाही गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या शेतात काम करून हे सालगडी कराडची शेती सांभाळत असल्याचे चित्र समोर आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;