पतंग उडविताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू, राहुरीतील घटनेने खळबळ

पतंग उडविताना विहिरीत पडून मुलीचा मृत्यू, राहुरीतील घटनेने खळबळ

पतंग उडविताना विहिरीत पडलेल्या 12 वर्षीय परप्रांतीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी ही घटना घडली.

बिनीता बिष्णू थापा (वय १२, रा. मानोरी, ता. राहुरी) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. नेपाळ येथील एक कुटुंब तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीतील खिळे वस्ती रोड परिसरात राहत आहे. मुलीचे वडील हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. त्यापैकी बिनीता बिष्णू थापा (वय 12) ही मोठी मुलगी असून, ती पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. पाच महिन्यांपूर्वी ती नेपाळ येथून मानोरीला आली होती.

आज सकाळी बिनीताने हट्ट केल्यामुळे वडील बिष्णू थापा यांनी तिला पतंग आणून दिली. सकाळी 8.30 च्या दरम्यान ती घराजवळ इतर मुलांबरोबर पतंग उडवीत असताना घराजवळ असलेल्या विहिरीत ती पडली.

बिनीता पाण्यात बुडू लागल्याने इतर मुलांनी आरडाओरडा केला. हा आरडाओरड ऐकताच परिसरातील सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन विहिरीत उड्या मारून पाण्यात बुडालेल्या विनीताचा शोध घेतला यावेळी विहिरीच्या तळाला असलेल्या बिनीताला दोरीने बांधून विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तिला तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे मानोरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;