श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास 54 कोटी 97 लाखांचे दान

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास 54 कोटी 97 लाखांचे दान

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीस 1 जानेवारी ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत 53 कोटी 97 लाखांचे दान प्राप्त झाल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

मंदिर समितीमार्फत भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने दर्शनरांग व्यवस्थापन, अन्नछत्र, लाडूप्रसाद, निवास इत्यादीचा समावेश आहे. याशिवाय भाविकांना ‘श्रीं’च्या नित्यपूजा, पाद्यपूजा व तुळशीपूजादेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात्रा कालावधीत दर्शनरांगेत मॅटिंग, विश्रांती कक्ष, आपत्कालीन दरवाजे, हिरकणी कक्ष, मोफत अन्नछत्र, एकादशीला साबूदाणा खिचडी वाटप, द्वादशीला तांदळाची खिचडी, मिनरल वॉटर, चहा, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल आदी उपक्रम मंदिर समितीने सुरू केले आहेत. तसेच ‘श्रीं ’च्या पूजेसाठी वाढती मागणी विचारात घेऊन, नित्यपूजेत दोन भाविक कुटुंबीयांना संधी, अन्नछत्र सहभाग योजना, महानैवेद्य सहभाग योजना, तुळशी अर्चन पूजा सुरू केल्या असून त्याची नोंदणीदेखील ऑनलाईन करण्यात आली आहे.

मंदिर समितीस वारकरी भाविकांकडून चांगले दान मिळत असून मिळालेल्या दानातून ‘श्रीं’च्या दर्शनासाठी येणाऱया वारकरी भाविकांना चांगल्या व अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे या वेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;