पुण्यात वर्षभरात 5500 जोडप्यांचे कोर्ट मॅरेज!

पुण्यात वर्षभरात 5500 जोडप्यांचे कोर्ट मॅरेज!

एकीकडे लग्नांमध्ये पैशांचा पूर येत असताना पुणे शहरातील अनेक जोडप्यांनी ‘कोर्ट मॅरेज’ला पसंती दिली आहे. यंदा वर्षभरात 5 हजार 500 जोडपी नोंदणी पद्धतीने विवाह बंधनात अडकली.

कायदेशीर पद्धतीने ठराविक पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत कमी खर्चात कोर्ट मॅरेजला पसंती दिली जात आहे. लग्नासाठी नोंदणी करण्याचे कार्यालय पुणे स्टेशन परिसरात आहे. स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट 1954 अन्वये विवाह नोंदणी केली जाते त्याची नोंद होते. विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाते. अर्ज केल्यानंतर 4 दिवसांत त्या अर्जाची पडताळणी केली जाते. त्यानंतर नोटीस पाठविण्यात येते. नोटीसचा कालावधी एक महिन्याचा असतो. पक्षकार हे तारीख ठरवून रजिस्टर करू शकतात. त्यांना लगेच मॅरेज सर्टिफिकेट दिले जाते, असे या कार्यालयाने सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;