नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण; माजी संचालक अजय बोरा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण; माजी संचालक अजय बोरा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळा प्रकरणांमध्ये बँकेचे माजी संचालक अजय बोरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांनी फेटाळून लावला आहे.

नगर अर्बन बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला आहे. सध्या बँकेचे लायसन रद्द करण्यात आले आहे. बँकेने कोट्यवधी रुपयांचे जे कर्ज दिले होते, ते अद्यापपर्यंत वसूल झालेले नाही. २९१ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळ्याचा विषय गाजला आहे. चार पोलीस ठाण्यांत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. प्रारंभी पोलिसांनी नंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने याचा तपास केला आहे.

माजी संचालक अजय बोरा यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला फिर्यादी राजेंद्र गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिजीत पुप्पाल यांनी आक्षेप घेतला. बँकेचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. या अगोदर ज्या संचालकांचा यामध्ये समावेश होता व त्यांनी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता, त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. अजय बोरा हेसुद्धा माजी संचालक आहेत. विशेष म्हणजे २९१ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात संचालक मंडळाने गांभीर्याने वसुली केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर लेखा परीक्षणामध्ये ताशेरे ओढले होते. अजय बोरा बँकेच्या ऑडिट रिकव्हरी कमिटीमध्ये सदस्य होते. त्यांनीसुद्धा गांभीर्याने दखल घेतली नाही. तसेच त्यांनी विरोधही केला नाही, त्यामुळे ही बाब गंभीर आहे. यांच्यामुळे खातेदार व ठेवीदारांचे हाल झाले, याला हेच संचालक मंडळ जबाबदार आहे. त्यामुळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावावा, असा युक्तिवाद अॅड. पुप्पाल यांनी न्यायालयासमोर केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अजय बोरा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;