श्रीकांत देशपांडे यांना यावर्षीचा वत्सलाबाई पुरस्कार

श्रीकांत देशपांडे यांना यावर्षीचा वत्सलाबाई पुरस्कार

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी सवाई गंधर्वांचे नातू आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे वे ज्येष्ठ शिष्य स्वर्गीय पं. श्रीकांत देशपांडे यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला असल्याची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना 2007 सालापासून मंडळाच्या वतीने दरवर्षी वत्सलाबाई जोशी पुरस्काराने गौरविण्यात येते. रोख रु. 51 हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडांगण येथे 18 ते 22 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ७०व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचे ‘नृत्य-प्रभा’ हे प्रदर्शन असेल. पाकणीकर म्हणाले, ‘नृत्यं गीतंतथा वाद्यं त्रयं संगीतमुच्यते!’ ही संगीताबद्दलची भारतीय संकल्पना आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गायिका स्वरयोगिनी, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना आदरांजली म्हणून त्यांच्याही प्रकाशचित्रांचा एक विभाग हे प्रदर्शनाचे दुसरे वैशिष्ट्य असणार आहे.

याबरोबरच 70 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकीट विक्री मंगळवार, दि. 10 डिसेंबरपासून सुरू होणार असून यावर्षी एरंडवणे येथील कमला नेहरू पार्कसमोरील शिरीष ट्रेडर्स, शनिपार येथील बेहरे आंबेवाले, सहकारनगर येथील अभिरुची फूड्स, कर्वेनगर येथील देसाई बंधू आंबेवाले, हेल्दी बगिचा, टिळक रस्ता येथील ग्राहक पेठ या ठिकाणी रसिकांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकिटे उपलब्ध होऊ शकणार आहेत.

संपूर्ण महोत्सवाच्या प्रवेशिका या खुर्चीसाठी रु. 5 हजार व 3 हजार रुपये इतक्या असणार असून, भारतीय बैठकीसाठी संपूर्ण महोत्सव प्रवेशिका या 500 रुपये असतील. वर नमूद ठिकाणांव्यतिरिक्त ticketkhidakee.com येथेदेखील महोत्सवाच्या ऑनलाइन प्रवेशिका उपलब्ध असतील

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;