प्रेमप्रकरणाच्या संशयावरून तरुणाचा खून, अल्पवयीन मुलासह दोघेजण ताब्यात

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून तरुणाचा खून, अल्पवयीन मुलासह दोघेजण ताब्यात

नातेवाईक  महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने एका आरोपीला अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

सचिनकुमार लखींदर राय (वय 23 बिहार) असे खून झालेल्याचे नाव आहे. गौतम रामानंद राय (वय 22, रा. तेजस रेसिडन्सी, मंगलनगर, वाकड, मूळ बंगरी, मुजफ्फरपूर, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा अल्पवयीन साथीदार यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.

पोलीस हवालदार आशिष बोटके यांना मिळालेल्या माहितीवरून आणि सहायक फौजदार सुनील कानगुडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून वाकड काळाखडक येथून पहाटे सव्वातीनच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले.

मयत सचिनकुमार याचे आरोपीच्या नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपीला होता. या कारणावरून नातेवाईक महिलेने घरही सोडले होते. त्यामुळे सचिनकुमार याला धडा शिकविण्यासाठी त्याचा खून केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर, डॉ. विशाल हिरे यांच्या औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक फौजदार सुनील कानगुडे, अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, मंगेश जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील नागेश माळी यांच्या पथकाने केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;