प्रदूषित पाणी… सांगलीकरांच्या जीवाशी खेळ, शेकडो लिटर पाण्याची गटारगंगा मिसळतेय कृष्णा नदीत

प्रदूषित पाणी… सांगलीकरांच्या जीवाशी खेळ, शेकडो लिटर पाण्याची गटारगंगा मिसळतेय कृष्णा नदीत

सांगली व कुपवाड शहराची शेकडो लीटर पाण्याची गटारगंगा दररोज कृष्णा नदीत मिसळत असल्याने सांगलीकरांना पाणी नव्हे, तर विष पचवावे लागत आहे. धुळगाव शेरीनाला योजना अपयशी ठरत आहे. आता नव्याने आखलेला 94 कोटींचा सांडपाणी शुद्धीकरणासाठीचा एसटीपी प्रकल्प अजूनही कागदावरच आहे. या योजनेला राज्य शासनाकडून कधी मंजुरी मिळणार? आणि सांगलीकरांना स्वच्छ पाणी कधी मिळणार? असा सवाल आता सांगलीकरांतून व्यक्त होत आहे.

सांगलीच्या शेरौनाल्याभोवती अनेक वर्षांपासून राजकारण फिरते. सांगली विधानसभा निवडणुकीत तर अनेकवेळा शेरीनाला प्रचाराचा मुद्दा बनला होता. त्यामुळे शेरीनाल्याचा विषय राज्यभर गाजत होता. कुपवाडच्या सावळी हद्दीपासून वाहणाऱ्या नाल्यातून दररोज शेकडो लीटर सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत होते. त्यामुळे कृष्णा नदी प्रदूषित होत होती. 1998 साली केंद्रात अटलबिहारी वायपेयी यांच्या काळात केंद्रीय पर्यावरणमंत्री सुरेश प्रभू यांनी राष्ट्रीय नदी कृती योजना राबवली. या अंतर्गत 2001 मध्ये धुळगाव शेरीनाला योजनेला मान्यता मिळाली. कृष्णा काठावर शेरीनाला अडवून पंपिंगद्वारे ते धुळगावपर्यंत नेणे व तेथे ऑक्सिडेशन पॉण्डमध्ये ते शुद्ध करून शेतीला पाणी देण्याची ही योजना होती. पूर्वीची 22 कोटींची असणारी योजना 38 कोटींवर गेली.

शेरीनाल्यावरील पंपगृह, कवलापूर येथील पंपगृह, धुळगावपर्यंतची 18 किलोमीटरची वाहिनी, धुळगाव येथे ऑक्सिडेशन पॉण्ड ही कामे पूर्ण झाली. तरीही कृष्णा नदीचे प्रदूषण थांबलेले नाही. शेरीनाल्यावर पंप बंद असतात, अथवा त्यात बिघाड झालेला असतो. त्यामुळे सांडपाणी थेट नदीत मिसळते. धुळगाव येथे शेतीच्या बांधापर्यंत पाणी पोहोचतच नाही. प्रकल्पातील काही कामे अद्याप अपूर्ण आहेत. धुळगावच्या शेतकऱ्यांनी वितरण व्यवस्थेसह इतर काही बदल योजनेत सुचविले होते. मात्र, त्याला शासनाकडून निधी मिळाला नाही. त्यामुळे या योजनेचे पंप कधी सुरू, तर कधी बंद असतात.

सांगली महापालिकेने आता सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी घुळगाव शेरीनाल्याच्या प्रकल्पाजवळ नव्याने एसटीपी बसविण्यात येणार आहे, तर ट्रक टर्मिनलच्या ठिकाणी २२ एमएलडी सांडपाणी प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. पूररेषेच्यावर हा प्रकल्प करण्यात येणार आहे. शिवाय सांगलीवाडी येथे तीन एमएलडीचा एसटीपी प्रकल्पदेखील उभारण्यात येणार आहे. तसेच जे. जे. मारुती येथे पंप बांधून ते पाणी शेरीनाल्यापर्यंत आणण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 94 कोटींचा सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव पाठवावा निधी देतो, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार महापालिकेने हा प्रस्ताव पाठविला आहे.

लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पडूनच आहे. आता राज्यात महायुती सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कुपवाडचे सांडपाणी थांबणार, प्रक्रिया होणार… 

कुपवाड ड्रेनेज योजनेचे काम सुरू झाले आहे. पूर्वी हे पाणी सांगलीला येत होते. मात्र, आता कुपवाड व परिसरातील सांडपाणी शेरीनाल्याकडे येणार नाही. त्या सांडपाण्यावर कुंभारमळा येथे प्रक्रिया होणार आहे. शुद्ध केलेले पाणी पुढे ओढ्यातून सोडले जाणार आहे. हनुमाननगर येथील ऑक्सिडेशन पॉण्ड 23 एमएलडी क्षमतेचे आहे. सध्या साडेबारा एमएलडी क्षमतेने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्या ठिकाणीही पूर्ण क्षमतेने प्रक्रिया केली जाणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;