हवामान, नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचनेसाठी शहरात ‘वेदर रडार मनोरा’

हवामान, नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचनेसाठी शहरात ‘वेदर रडार मनोरा’

शहराचे बदलते हवामान, प्रदूषण व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना व त्यांचे परिणाम, आपत्ती व्यवस्थापन करताना राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि भारतीय हवामान विज्ञान विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. हवामान बदलातील विविध आव्हाने सक्षमपणे हाताळण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

निगडी येथील दुगदिवी टेकडी येथे हवामान बदलाचे संकेत देणारा अत्याधुनिक एक्स-बैंड डॉप्लर वेदर रडार मनोरा उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी निश्चित केलेल्या जागेची पाहणी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पुणे येथील भारतीय हवामान विज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी केली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहायक आयुक्त उमेश ढाकणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उद्यान अधीक्षक योगेश वाळूज, भारतीय हवामान विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ उदय शेंडे, डॉ. शिजो झकारिया, अश्विन राजू डी. के. आदी उपस्थित होते.

रडार प्रणाली उभारण्यासाठी महापालिकेद्वारे जागा उपलब्ध करून दिली आहे. हवामान विभागामार्फत रडार उभारण्यात येणार आहे. जागतिक स्तरावरील हवामान झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बदलते हवामान आणि त्यामुळे उद्भवणारी आपत्ती यावर संरचनात्मक उपाययोजना करण्यासाठी तसेच शहराच्या शाश्वत विकासासाठी हवामान व वातावरणीय बदलाच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये झालेला सामंजस्य करार भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

भारतीय हवामान खाते पिंपरी चिंचवड महापालिकेला वेळोवेळी शहरातील हवामानाचे अंदाज तसेच त्याबाबत करावयाच्या उपाययोजना याबाबत सूचना देणारी माहिती पुरवणार आहे. या माहितीचा उपयोग महापालिकेला विविध उपाययोजना आणि नियोजन करण्यासाठी होणार असल्याचे आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.

” “एक्स-बैंड डॉप्लर वेदर रडार” एक अत्याधुनिक स्वदेशी रडार प्रणाली आहे. या प्रणालीचे कार्यपरीक्षेत्र सुमारे १०० किलोमीटर परिघात असणार आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्राचे, गड परिसर आणि आसपासच्या भागांचा समावेश असणार आहे. आपत्तीजनक हवामान घटनांची वास्तविक समय निरीक्षण क्षमता, अधिक पाऊस, वादळ, गारपीट, इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी या रडारप्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरावर परिणाम करणाऱ्या वातावरणीय घटकांची माहिती महापालिकेला वेळोवेळी | पुरवली जाणार आहे. के. एस. होसाळीकर, भारतीय हवामान विज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;