आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्यास 500 रुपयांचा दंड, नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीचा आदर्श ठराव

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्यास 500 रुपयांचा दंड, नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीचा आदर्श ठराव

सध्या दैनंदिन बोलण्या-चालण्यात कोणीही सहज आई-बहिणीवरून एकमेकांना शिवीगाळ करतात. याचा लहान मुलांवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे आई व बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घातली पाहिजे, अशी संकल्पना समोर आणत अहिल्यानगर जिह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने गावात शिव्या देणाऱ्याला पाचशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सौंदाळाच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव झाला. शिव्या देण्यावर बंदी घालून महिला-भगिनींचा सन्मान करण्यात येत आहे, असे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.

ग्रामसभेमध्ये बालकामगार बंदीचाही ठराव घेण्यात आला. बाल कामगारमुक्त गाव करण्यासाठी ‘बालकामगार दाखवा.. एक हजार रुपये मिळवा,’ अशी घोषणा करून बालकामगार दिसल्यास फोटो काढून ग्रामपंचायतीकडे सादर केल्यास त्या व्यक्तीस बक्षीस देण्याचेही ठरविण्यात आले.

गावामध्ये बालविवाहास शंभर टक्के बंदी करण्यात आली आहे. गावात कुणीही बालविवाह करू नये, केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही ग्रामसभेत ठरले. सोशल मीडिया आणि मोबाईलमुळे विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत घरात असलेल्या कोणत्याही शालेय विद्यार्थ्याकडे मोबाईल द्यायचा नाही, असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. या सर्व ठरावांची सूचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडली, तर गणेश आरगडे यांनी अनुमोदन दिले.

ठरावात काय नमूद?

टोकाच्या भांडणाचे मूळ कारण म्हणजे शिवीगाळ करणे असते. शिवीगाळ करताना अर्वाच्य भाषेत महिलांचा उल्लेख केला जातो. वास्तविक पाहता त्या भांडणामध्ये स्त्रियांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो. तरीदेखील तेथे स्त्रियांचा विनाकारण अपमान केला जातो. नऊ महिने ज्या आईच्या उदरात राहून जन्म घेतलेला असतो, अशा पवित्र व्यक्तीचा आपण अपमान करतो. शिवीगाळ देण्यास बंदी आणण्यासाठी ग्रामपंचायतीने कडक भूमिका घेऊन शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीस पाचशे रुपयांचा दंड करावा व तो न भरल्यास ग्रामपंचायत दप्तरी त्याची नोंद घेऊन तो वसूल करण्यात यावा, असे आजच्या सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;