दूध का दूध, पाणी का पाणी होणार! ईव्हीएमच्या पोलखोलसाठी बॅलेट पेपरवर मतदान, माळशिरसमधील मारकडवाडी ग्रामस्थांचा निर्णय

दूध का दूध, पाणी का पाणी होणार! ईव्हीएमच्या पोलखोलसाठी बॅलेट पेपरवर मतदान, माळशिरसमधील मारकडवाडी ग्रामस्थांचा निर्णय

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएम मशिनवर झालेल्या मतदानावर जोरदार आक्षेप घेतला आहे. ईव्हीएममधून झालेल्या मतदानाची पोलखोल करण्यासाठी 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव केला आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे, अशी विनंती सरपंच व्ही. जी. मारकड यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) उमेदवार उत्तम जानकर हे 13 हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. जानकर यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला.

जानकर यांचा कमी मतांनी झालेला विजय मारकडवाडी ग्रामस्थांना मान्य नसून, जानकर एक लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी व्हायला पाहिजेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएमचे कटकारस्थान असल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. मारकडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने 80 टक्के मतदान झालेले असताना ईव्हीएममधून वेगळीच आकडेवारी समोर येत आहे. निवडणुकीत राम सातपुते यांना 843 मते, तर जानकर यांना 1003 मते मिळाली आहेत. या मतदानावर गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवून ईव्हीएमची पोलखोल करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. सातपुते यांना मिळालेल्या 843 मतांवर संशय असून, त्यांना गावातून फारतर शे-दीडशे मते मिळायला पाहिजे होती, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

मतदानाचे गावात लागले फलक

बॅलेट पेपरवरील मतदानासाठी गावात फलक लावून मतदानाप्रमाणे सर्व प्रक्रिया घेतली जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापण्यास दिल्या असून, गावातील प्रत्येकाने आपण या निवडणुकीत ज्याला मतदान केले, त्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. राज्यातील बहुतांश नेते ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित करू लागल्याने मारकडवाडी हे राज्यातील पहिले गाव असून, ज्या गावाने थेट बॅलेट पेपरवर मतदान घेऊन ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ करण्याचे पाऊल उचलले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;