ईव्हीएम ‘झोल’ पडताळणी; 11 उमेदवारांनी भरले पैसे

ईव्हीएम ‘झोल’ पडताळणी; 11 उमेदवारांनी भरले पैसे

विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या जिह्यातील 11 उमेदवारांनी मतमोजणी यंत्रांची म्हणजेच ईव्हीएम ‘झोल’ पडताळणी करण्यासाठी पैसे भरून अर्ज केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, (हडपसर), अशोक पवार (शिरूर), रमेश बागवे (पॅन्टोन्मेंट बोर्ड), सचिन दोडके (खडकवासला), यांचा यामध्ये समावेश आहे. मतदान यंत्राच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ निश्चित करून दिली जाणार आहे.

या उमेदवारांना प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये पडलेली मते आणि त्यांना अपेक्षित असलेल्या मतदानामध्ये काही पेंद्रांवर प्रचंड मोठी तफावत असल्याचा त्यांचा संशय आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांनी एकूण मतदान केंद्राच्या किंवा मतदान यंत्र संख्येच्या पाच टक्के या प्रमाणामध्ये मतदान यंत्रांची पडताळणी करून घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. मतदान यंत्र पडताळणीसाठी प्रत्येकी शुल्क आणि त्यावर जीएसटी असे एकूण 47 हजार रुपये प्रति यंत्र याप्रमाणे त्यांनी शुल्क जमा केले आहेत.

अशी होणार मतदान यंत्रांची पडताळणी

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या मतदान यंत्राची पडताळणी करावयाचे आहे त्या यंत्राची निवड करण्याचा अधिकार संबंधित अर्जदार उमेदवाराला आहे. ज्या मतदान पेंद्र आणि मतदान यंत्राची निवड उमेदवाराने केली आहे त्या यंत्रामधील संपूर्ण मतांचा डाटा डिलीट केला जाईल. त्यानंतर त्याच मतदान यंत्रावर चिन्हाचे बटण एकूण बाराशे वेळा दाबून त्या बटणांचे एकूण मतदान मोजले जाईल. प्रत्येक यंत्रासाठी फेर पडताळणी करताना ही प्रक्रिया अवलंबली जाणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;