सत्ताधाऱ्यांनाही EVM वर संशय; माजी मंत्र्यानं फेरमतमोजणीसाठी भरले पैसे, 1243 मतांनी झालेला पराभव

सत्ताधाऱ्यांनाही EVM वर संशय; माजी मंत्र्यानं फेरमतमोजणीसाठी भरले पैसे, 1243 मतांनी झालेला पराभव

विधानसभा निवडणुकीचा अनाकलनीय निकाल लागला. अनेक ठिकाणी झालेले मतदान आणि मिळालेली मते यामध्ये तफावत असल्याचे दिसले. तर काही ठिकाणी विजयी आणि पराभूत उमेदवारांना सारखीच मते मिळाल्याचे दिसून आले. विरोधकांनी याविरोधात रान उठवले असून महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात मोहीमही हाती घेतली आहे. विशेष म्हणजे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला असून माजी मंत्र्याने फेरमतमोजणीसाठी पैसे भरले आहेत.

विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघामध्ये ‘कांटे की टक्कर’ पहायला मिळाली. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला, तर काहींनी अवघ्या काही मतांनी आपला किल्ला राखला. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांचाही समावेश असून कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांनी अवघ्या 1243 मतांनी विजय मिळवत भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव केला.

हे वाचा – नाशिक पश्चिममधील व्हीव्हीपॅट मोजणीस नकार, ईव्हीएम घोटाळा दडपण्यासाठी मॉक ड्रिलचा उतारा

हे वाचा – अचानक 76 लाख मतदान कसं वाढलं? निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर डाका टाकला

राम शिंदे यांनी पराभवानंतर अजित पवार गटावर हल्ला चढवला होता. तसेच ईव्हीएमची फेरमतमोजणी करण्यासाठी त्यांनी 8 लाख 2 हजार 400 रुपये भरले आहेत. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील 17 बूथवरील ईव्हीएमची मते आणि व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या यांच्या पडताळणीची मागणी राम शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांनंतर आता सत्ताधाऱ्यांचाही ईव्हीएमवर विश्वास नसल्याचे दिसले आहे.

इस्रायली टेक्नॉलॉजीद्वारे ईव्हीएममध्ये फेरफार; मविआची निकालाविरोधात रणनिती ठरली

प्राजक्त तनपुरे, संदीप वर्पे, राणी लंके यांचेही अर्ज

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे, कोपरगाव मतदारसंघातील संदीप वर्पे आणि पारनेर मतदारसंघातील राणी लंके यांनीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालिमठ यांच्याकडे अनामत रक्कम भरून ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज केले आहेत.

उरणमध्ये ईव्हीएमचा झोल; मतदानापेक्षा मोजणीत जास्तीची मते आली कुठून? फेरमोजणीसाठी मनोहर भोईर यांची मागणी

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;