मुलासमोरच आईची डोक्यात हातोडी घालून हत्या

मुलासमोरच आईची डोक्यात हातोडी घालून हत्या

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय आणि पैशांच्या तगाद्यामुळे प्रियकराने तीन वर्षांच्या मुलासमोरच तिच्या डोक्यात हातोडी घालून खून केला. डोळ्यांसमोरच आईची हत्या होत असताना मुलाने एकच टाहो फोडला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह साताऱ्यातील खंबाटकी घाटात फेकून दिला. त्यानंतर स्वतः पोलिसांत धाव घेत प्रेयसी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तसेच तीन वर्षांच्या मुलाला आळंदी यात्रेत सोडून दिले. हा प्रकार वाकड येथे उघडकीस आला.

जयश्री विनय मोरे (वय 27, रा. मारुंजी, हिंजवडी) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे, तर दिनेश पोपट ठोंबरे (वय 32, रा. करुंज, मावळ) याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

जयश्री आणि दिनेश मागील चार वर्षांपासून विवाह न करता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये मारुंजीत राहत होते. त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा आहे. जयश्रीचेही पहिले लग्न झाले असून, ती पतीपासून विभक्त राहत होती. दिनेशचे पहिले लग्नही झाले आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत.

दिनेश हा चहाची टपरी आणि हिंजवडीतील एका खासगी कंपनीत एसी दुरुस्तीचे काम करीत होता. जयश्री गृहिणी होती. दिनेश जयश्रीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पैशांवरूनही त्यांच्यात वाद होत होते. यावरून 24 नोव्हेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास भूमकर चौकात दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी त्यांच्यासोबत तीन वर्षांचा मुलगा आणि दिनेशची पत्नीही होती. दिनेशने मोटारीतील हातोडी जयश्रीच्या डोक्यात मारली. त्यात तिचा मृत्यू झाल्याने मुलाने एकच टाहो फोडला.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह साताऱ्यातील खंबाटकी घाटात फेकून दिला. मुलाला आळंदी यात्रेत पोलिसांजवळ सोडून दिले. मंगळवारी वाकड पोलीस ठाण्यात जात जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांना तपासादरम्यान दिनेशवर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केल्याची माहिती उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली. पोलिसांनी तीन वर्षांच्या मुलाला जयश्रीच्या आई-वडिलांकडे सोपविले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;