नवनिर्वाचित आमदारांचे औक्षण करताना आगीचा भडका, गुलाल उधळताना घडली दुर्घटना

नवनिर्वाचित आमदारांचे औक्षण करताना आगीचा भडका, गुलाल उधळताना घडली दुर्घटना

चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्या विजयानंतर जेसीबीमधून गुलालाची उधळण करण्यात येत असतानाच आगीचा भडका उडाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये नवनिर्वाचित आमदारांसह 34 जण जखमी झाले. त्यात काही महिला जखमी झाल्या आहेत.

शनिवारी सायंकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाजी पाटील यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी औक्षण करण्यासाठी महिला थांबल्या होत्या. शिवाजी पाटील हे गाडीतून उतरले. त्यानंतर महिलांकडून औक्षण सुरू असतानाच जेसीबीमधून गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी गुलालामधील रासायनिक घटकांचा आगीशी संपर्क झाल्याने आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या दुर्घटनेत नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांच्यासह काही महिला जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून, सर्वजण सुखरूप आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;